Thane News: ठाणे-घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद, असे असणार पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane News: ठाणे ते घोडबंदर राज्य मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
ठाणे : ठाणे-घोडबंदर राज्य मार्ग क्रमांक 84 वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या रस्त्यावरील गायमुख घाटामधील ठाणे ते घोडबंदरला जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 26 ते 29 एप्रिलदरम्यान हे काम करण्यात येणार आहे. कामादरम्यान वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी ठाणे ते घोडबंदर हा मार्ग अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
गायमुख घाटातील ठाण्याहून घोडबंदरला जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीचे काम सीजीबीएम आणि सीबी या पद्धतीने करण्यात येत आहे. हे काम 26 एप्रिलला पहाटे 1 ते 29 एप्रिल रोजी रात्री 11:55 या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे ते घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.
advertisement
ठाणे ते घोडबंदर असा बंद
मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला वाय जंक्शन व कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद असणार आहे. त्याऐवजी मुंबई, ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड वाहने वाय जंक्शन येथून नाशिक रोडने खारेगाव टोलनाका मानकोली, अंजूरफाटा मार्गे जातील.
मुंब्रा, कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोल नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटामार्गे पुढे जातील.
advertisement
घोडबंदर ते ठाणे असा बंद
गुजरातकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद राहील. तर मुंबई, विरार- वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने मोठ्या वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.
गुजरात, मुंबई, विरार वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ही चिंचोटी नाका येथून कामण, अंजूरफाटा, माणकोली भिवंडीमार्गे पुढे जाणार आहे.
advertisement
मालवाहतुकीसाठी परवानगी
view commentsमोठ्या वाहनांना मालवाहतुकीसाठी रात्री 10 ते सकाळी 7 आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातून परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अवजड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही. पुढील वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचाच वापर करावा लागेल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
April 25, 2025 9:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane News: ठाणे-घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद, असे असणार पर्यायी मार्ग


