Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी भरून ठेवा, 24 तास थेंबही येणार नाही, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Thane Water Cut: उन्हाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लाकत असून आता पुढील 2 दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. अशातच पुढील 2 दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात, दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीतील सर्व भागांमध्ये, रुपादेवी पाडा, माजिवडा- मानपाडा येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सध्या तीव्र उन्हाळा असून ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनिलांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने घट होतेय. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने केले आहे.
advertisement
ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी रात्री 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री 12.00 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कटाई नाका ते ठाणे या दरम्यान 24 तासांसाठी पाणी येणार नाही. शनिवारपासून 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तसेच पाणी कपातीच्या काळात पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेय.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
April 24, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी भरून ठेवा, 24 तास थेंबही येणार नाही, कारण काय?


