महिलांना खरेदीसाठी हे दुकान आहे best option! स्वस्तात मस्त मिळतील भरपूर वस्तू, location काय?

Last Updated:

नवीन ड्रेस शिवायचा असेल, ब्लाउज शिवायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे लटकन, कलरचे अस्तर या गोष्टी लागतातच. तुम्हाला जर होलसेल भावात या सर्व डिझाईनच्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही याठिकाणी खरेदी करू शकतात.

+
जानकी

जानकी कृपा नोवेल्टी दिवा

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : काही लोक सुरुवातीला अगदी संघर्षातून आपला व्यवसाय सुरू करतात आणि प्रचंड मेहनत करुन त्या व्यवसायाला मोठं करतात. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. रिंकू यादव असे या महिलेचे नाव आहे.
ठाण्यातील दिवा येथे रिंकू यादव यांचे जानकी कृपा आणि मॅचिंग सेंटर या नावाने दुकान आहे. नवीन ड्रेस शिवायचा असेल, ब्लाउज शिवायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे लटकन, कलरचे अस्तर या गोष्टी लागतातच. तुम्हाला जर होलसेल भावात या सर्व डिझाईनच्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही याठिकाणी खरेदी करू शकतात. मागील 15 वर्षांपासून रिंकू यादव यांनी आपल्या पतीच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
काय आहे वस्तूंची किंमत -
या दुकानात तुम्हाला हव्या असणाऱ्या प्रकारचा कपडा, रंगीबेरंगी लेस, लटकन, उलन, घागऱ्यासाठी लागणारा कपडा, रंगीबेरंगी ब्लाऊज पीस, क्राफ्ट मटेरियल या सर्व गोष्टी स्वस्त दरात मिळतील. या दुकानात मिळणारे धाग्यांचे अगदी 10 ते 15 रुपयांपासून सुरू होतात. इथे सुंदर रंगाचे ब्लाऊज पीससुद्धा 50 रुपयांपासून उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कुठे ओटी भरायचे असेल तर हे ब्लाऊज पीस उत्तम आहेत.
advertisement
साडीच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसेसना वेगवेगळ्या प्रकारचे लटकन लावले जातात. ते सुद्धा इथे अगदी 10 रुपयांना जोडी या भावात मिळतात. यामध्ये तुम्हाला हवा असणारे रंग तुम्ही निवडू शकता. ब्लाउजला लागणाऱ्या दोऱ्यासुद्धा तुम्हाला पाच रुपये मीटरपासून मिळतील. तसेच संपूर्ण बंडल घेतलं तर 50 रुपये द्यावे लागतील.
इथे ब्लाउजसुद्धा कॉटन, फॅब्रिक, प्लेन, जरी ब्लाउज अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. दुकानात ड्रेस पीससोबतच जर घागरा घालण्याची सुद्धा आवड असेल तर इथे वेगवेगळ्या रंगांचे घागऱ्याचे कपडेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यांची किंमत फक्त 180 रुपये मीटर अशी आहे. यासोबतच कपड्यांना लागणाऱ्या लेससुद्धा अगदी स्वस्त म्हणजे 5 रुपयांपासून इथे उपलब्ध आहेत. इथे विकणाऱ्या बटनांमध्ये सुद्धा व्हरायटी आहे. रंगीबेरंगी बटन्स इथे अगदी दहा रुपयांपासून मिळतात.
advertisement
काय म्हणाल्या रिंकू यादव -
'आम्ही सुरुवातीला छोट्या दुकानापासून सुरुवात केली होती. माझ्या दोन छोट्या मुलांना घेऊन मी रोज दुकानात यायचे आणि काम करायचे. माझ्या पतीने आणि मी मेहनत करून हे दुकान इथपर्यंत आणले आहे. जर कोणालाही होलसेल भावात कमीत कमी किमतीत वस्तू हव्या असतील तर त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो,' असे जानकी कृपा नोबेलटीच्या मालक रिंकू यादव यांनी सांगितले.
advertisement
रिंकू यादव यांचे दुकान पूर्वी छोटसं होतं. पतीसोबत मेहनत करून त्यांनी होलसेलचे मोठे दुकान घेत मोठं यश मिळवलं आहे. तुम्हाला इतर होलसेल भावात या वेगवेगळ्या डिझाईनच्या वस्तू हव्या असतील तर आवर्जून याठिकाणी खरेदी करण्यासाठी येऊ शकतात.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
महिलांना खरेदीसाठी हे दुकान आहे best option! स्वस्तात मस्त मिळतील भरपूर वस्तू, location काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement