Thane : ठाण्यात वाहतुकीत मोठे बदल, हे असतील पर्यायी मार्ग
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
ठाणे शहरातील कॅडबरी मेट्रो स्थानकावर छत उभारणीसाठी विशेष काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक शाखेने काही महत्त्वपूर्ण वाहतूक बदल लागू केले आहेत.
ठाणे : ठाणे शहरातील कॅडबरी मेट्रो स्थानकावर छत उभारणीसाठी विशेष काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 10 टन क्षमतेची मोबाइल क्रेन मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी उड्डाण पुलावर उभी केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक शाखेने काही महत्त्वपूर्ण वाहतूक बदल लागू केले आहेत.
वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहतूक योजना तयार करण्यात आली आहे. मुंबईकडून नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना आता नितीन कंपनी उड्डाण पुलावर चढण्याच्या सुरुवातीस असलेल्या दुभाजकाजवळून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना आता स्लीप रोडने नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन मार्गे कापुरबावडीकडे वळवण्यात येईल.
advertisement
ही वाहतूक योजना 16 मे ते 25 मे या कालावधीत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अंमलात राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
May 17, 2025 9:29 AM IST


