Uddhav Thackeray Interview : कोविड महासाथीच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच उत्तर दिलं, ''त्या काळात...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray : करोना महासाथीच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सुरू झाले आहेत. कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाला धार चढू लागली आहे. भाजप-शिंदे गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला घेरण्याची जोरदार तयारी केली जात असून जु्न्या आरोपांना पुन्हा नव्याने धार लावली जात आहे. करोना महासाथीच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सुरू झाले आहेत. कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यूज १८ लोकमतला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना दिली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टाने कौतुक केले. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी संस्थानी मुंबईतील कामाचं कौतुक केले. मुंबई मॉडेलची चांगली युती धझासी
advertisement
करोना काळात गंगेत प्रेत वाहत होती. ती प्रेते कोणाची यात मी जाणार. मात्र, कोरोनाची परिस्थिती आपल्याकडे चांगले काम झाले. मुंबई आणि महाराष्ट्रात कोविड काळात चांगले काम झाले. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्याची दखल घेतली होती, असेही ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही केलेल्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप झाला. त्यानंतर काय झाले, असा उलट सवाल त्यांनी केला. आमच्यावर फक्त आरोपच करण्यात आल्याचे ठाकरे यांनी म्हटले. करोनाची साथ सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी साथरोग कायदा (Epidemic Act) लागू केला. त्या काळात कामासाठी टेंडरची गरज नसते. तरीही मुंबई महापालिकेने शॉर्ट नोटीसवर टेंडर काढले असल्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
advertisement
मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत मजूर होते. त्यांना तीन वेळच्या जेवणासाठी टेंडर काढण्यात आले. मजूरांना खिचडी देण्यात आली. तातडीने एवढ्या लोकांसाठी खिचडी तयार होऊ शकते, म्हणून खिचडी वाटप करण्यात आल्याचे ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, ९२ हजार कोटींच्या एफडीमधून प्रशासनाच्या आर्थिक बाबी, गरजा भागवल्या जातात. यामध्ये पीएफ, ग्रॅज्युटी आदी गोष्टी दिल्या जातात. त्याशिवाय, महापालिकेचे प्रकल्प पूर्ण केले जातात. कोस्टल रोडचे कामही अशाच पद्धतीने पूर्ण केले. भाजप-शिंदे गटाचे प्रशासक आल्यानंतर ३ लाख कोटींचे देणं करुन ठेवलं असल्याचा आरोप त्यांनी केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 2:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Interview : कोविड महासाथीच्या काळात भ्रष्टाचाराचा आरोप, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच उत्तर दिलं, ''त्या काळात...''









