आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमागे दडलंय काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित आहेत. मागील एक महिन्याच्या अंतरात ही दुसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
याआधी राज ठाकरेंच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते. तेव्हा दोन्ही भावांचं मनोमिलन झाल्याची चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात झाली होती. मागच्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. आधी मेळाव्यात नंतर गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे यांचं कुटुंब राज ठाकरे यांच्या निवसस्थानी गेले होते. मात्र, गणेशोत्सवा दरम्यानची भेट ही कौटुंबिक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आजची भेट ही पूर्णपणे राजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
आजची भेट राजकीय?
आजची भेट ही कौटुंबिक नसून राजकीय बैठक असल्याची म्हटले जात आहे. आज राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीसोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल परब देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आजची ही भेट पूर्ण राजकीय असल्याचे चित्र आहे. ऐन दसरा मेळाव्याच्या आधीच ही भेट झाल्याने राजकीय चर्चांना आणखीच उधाण आले आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीची समीकरणं जुळणार?
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची ही भेट झाली असल्याची चर्चा आहे. आगामी मु्ंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जागा वाटप आणि काही महत्त्वाच्या जागांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निकटवर्तीय समजले जाणारे संजय राऊत आणि अनिल परब हेदेखील उपस्थित आहेत. अनिल परब यांना मुंबईच्या प्रत्येक वॅार्डची खडानखडा माहिती आहे. ते या बैठकीत आवर्जून उपस्थित आहेत. तर, मनसे नेते बाळा नांदगावकर देखील या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळेच राजकीय चर्चा आजच्या बैठकीत होणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 12:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आताची सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, भेटीमागे दडलंय काय?