Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट का घेतली? उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटांसाठी ही भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे.त्यानंतर या भेटीचा तपशील उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर सांगितला आहे.
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. एकेकाळचे कट्टर मित्र असलेले नेते, गेल्या काही वर्षात कट्टर वैरी झाले आहेत. याच कट्टर नेत्यांची आज खूप वर्षानी भेट घडून आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. अवघ्या 5 ते 10 मिनिटांसाठी ही भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे.त्यानंतर या भेटीचा तपशील उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर सांगितला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे आम्ही निवडणुक जिंकू शकलो नाही.ते जिंकले आणि त्याचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे साहाजिकच आहे या सरकारकडून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवू, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी मांडली.
advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्य़क्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते कोणाचा असावा यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवासांची ठाकरेंनी अचानक भेट घेतल्यानंतप चर्चांना उधाण आले आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 17, 2024 4:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट का घेतली? उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...


