अजितदादांशी युती करायची की नाही? शरद पवारांच्या पक्षात मतभेद, पुण्यातून मोठी बातमी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती व्हावी, अशी रोखठोक भूमिका घेतली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेऊन युती करायची की नाही, याबाबत पुणे शहर शरदचंद्र पवार पक्षात मतभेद असल्याचे चित्र आहे. अजित पवारांशी युती नको, अशी भूमिका मांडलेल्या प्रशांत जगताप यांना पक्षातूनच विरोध असल्याचे समोर आले आहे. पक्षातला एक गट अजित पवार यांच्यासोबतच्या युतीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते.
अजित पवार यांच्यासोबत युतीचा निर्णय झाला तर सार्वजनिक आयुष्यातून आणि राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयाची राज्यभर चर्चा असताना पक्षातूनच त्यांच्या भूमिका विरोध होत आहे.
अजित पवार यांच्यासोबत युती व्हावी-विशाल तांबे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती व्हावी, अशी रोखठोक भूमिका घेतली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबतच्या युतीवर निर्णय घेतील, असे विशाल तांबे म्हणाले. तसेच पक्षातील एक गट युतीसाठी सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement
युती-आघाडी बाबत अंतिम निर्णय शरद पवार घेतील. शनिवारी रात्री पक्षाची बैठक झाली. शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच शशिकांत शिंदे हे एकत्रित बसून पुणे शहराचा निर्णय घेतील. पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय आणि त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल असे विशाल तांबे यांनी सांगितले.
प्रशांत जगताप यांची भूमिका काय?
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. अजित पवार यांच्यासोबत माझे अतिशय चांगले संबंध आहेत, परंतु ही विचारधारेची लढाई असल्याचे जगताप म्हणाले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांशी युती करायची की नाही? शरद पवारांच्या पक्षात मतभेद, पुण्यातून मोठी बातमी


