मोठी बातमी! तपासणीसाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी धरणात बुडाला; चार जणांना वाचवण्यात यश
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे.
वर्धा, 20 नोव्हेंबर, नरेंद्र मते : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पाच अधिकाऱ्यांपैकी चार अधिकाऱ्यांना वाचवण्यात यश आलं, तर एक जण बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. तपासणी करून परत येत असताना काठावर येण्यासाठी ते ज्या प्लॅटफार्मवर उभे होते, तो प्लॅटफार्म पलटी झाल्यानं ही घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सांयकाळच्या सुमारास बोर धरणातील केजची तपासणी करण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी आले होते. याचदरम्यान ही घटना घडली आहे. केजची तपासणी करून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. काठावर येण्यासाठी ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे होते, तो प्लॅटफॉर्म पलटी झाल्यानं पाच मत्स्य विभागाचे अधिकारी तोल जाऊन पाण्यात पडले, मात्र यातील चार जणांच्या हाताला वेळीच दोरी लागल्यानं त्यांना वाचवण्यात यश आलं आहे, तर अद्याप एक अधिकारी बेपत्ता आहे. त्या अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे.
advertisement
दरम्यान घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. प्लॅटफॉर्म पलटी झाल्यानंतर हे पाचही अधिकारी पाण्यात पडले होते, मात्र यातील चौघांच्या हाताला तेथील दोरी लागल्यामुळे त्यांना वाचावण्यात यश आलं. तर बेपत्ता झालेल्या अधिकाऱ्याचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध सुरू आहे.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
Nov 20, 2023 9:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
मोठी बातमी! तपासणीसाठी आलेला मत्स्य विभागाचा अधिकारी धरणात बुडाला; चार जणांना वाचवण्यात यश










