advertisement

दुर्गा देवीमुळे गावकऱ्यांत वाढतो एकोपा, विदर्भातील गावाची आदर्श परंपरा

Last Updated:

विदर्भातील येळाकेळी गावाने दुर्गा उत्सवाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. नवरात्रीत संपूर्ण गाव एकत्र येतोय.

+
दुर्गा

दुर्गा देवीमुळे गावकऱ्यांत वाढतो एकोपा, विदर्भातील गावाची आदर्श परंपरा

वर्धा, 22 ऑक्टोबर: नवरात्रीनिमित्त अनेकांच्या घरी घटस्थापना होते आणि अखंड ज्योतही लावली जाते. विशेषतः विदर्भात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गावोगावी आणि अगदी गल्लोगल्ली दुर्गा मंडळ असल्याचंही दिसून येतं. या मंडळांचा खर्च लाखोंच्या घरात होतो. मात्र वर्धा ते आर्वी मार्गावर असणाऱ्या येळाकेळी येथील नवरात्र उत्सव याला अपवाद ठरतोय. या गावात 'एक गाव एक देवी' ही संकल्पना कित्येक वर्षांपासून राबविली जात आहे. विशेष म्हणजे या उत्सवासाठी संपूर्ण गाव एकत्र येत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतं.
गावात देवीचं मंदिर
येळाकेळी येथे 1981 साली देवीच्या मंदिराची स्थापना झाली. या स्थापनेचे प्रेरणास्थान संत सयाजी महाराज आहेत. तेव्हापासून गावात एक गाव, एक देवी ही परंपरा सुरू झाली. ती अद्याप कायम आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श असल्याचं गावकरी मयूर महाराज सांगतात.
advertisement
सामाजिक एकोपा जपण्याचा उद्देश
एकीकडे दुर्गा मंडळांमध्ये लाखोंचा खर्च होतो तर येळाकेळी या गावातील सर्व नागरिक मिळून फक्त एकाच देवीची स्थापना करतात. जेणेकरून खर्चही होणार नाही आणि गावातील सामाजिक एकता ही जपली जाईल. नवरात्रोत्सवानिमित्त गावकरी एकत्र यावेत गावकऱ्यांनी आपले सण उत्सव एकत्रितरित्या सामूहिकरीत्या साजरे करावे. जातीभेद नसावा, सामाजिक एकोपा, सामाजिक सलोखा जपावा. सोबतच गावातील नव्या पिढीला सण उत्सव साजरे करण्या संदर्भातील परंपरा तसेच एकत्र समाजाचं महत्त्व कळावं, हा एक गाव एक देवी ही संकल्पना राबवण्यामागचा उद्देश आहे, असं गावकरी मयूर महाराज सांगतात.
advertisement
कार्यक्रमांमध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नवरात्र उत्सवात नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम मंडळाकडून आयोजित केले जातात. ज्यामध्ये संपूर्ण येळाकेळी वासियांचा अगदी चिमुकलांसह वृद्धांपर्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. येळाकेळी गावात हीच परंपरा कायम राहण्यासाठी गावकरीही प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारच्या उत्सवामुळे होणारे विचारांचे आदान प्रदान आणि सामाजिक एकता याचे महत्त्व नवीन पिढीला उमजले तर ही परंपरा नवीन पिढीद्वारे पुढे राहण्यास मदत होईल असे मयूर महाराजांनी सांगितले. सर्वांनी गल्लोगल्ली मूर्ती स्थापन करण्या ऐवजी एक गाव एक देवी ही संकल्पना राबवण्याचा आवाहन देखील मंडळाच्या वतीने करण्यात येतं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
दुर्गा देवीमुळे गावकऱ्यांत वाढतो एकोपा, विदर्भातील गावाची आदर्श परंपरा
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement