Prashant Koratkar : दोन जिल्ह्यांच्या पोलिसांना चकवा, तेलंगणाआधी महिनाभर कुठं लपून होता कोरटकर? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर महिनाभर कुठं होता, याची माहिती समोर आली आहे. एका बुकीमुळेच कोरटकरच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी, नागपूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्ये काढल्या प्रकरणी प्रशांक कोरटकर याला अटक करण्यात आली आहे. जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता. अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून त्याला अटक केली. आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले आहे. प्रशांत कोरटकर महिनाभर कुठं होता, याची माहिती समोर आली आहे. एका बुकीमुळेच कोरटकरच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.
महिनाभर कुठं लपला होता कोरटकर?
इंद्रजीत सावंत यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे नागपूर येथील त्याच्या घरी दाखल झाल्यानंतर कोरटकर घरी नसल्याचे आढळले. त्याच दरम्यान, कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अंतरीम जामिनावर असताना कोरटकर हा नागपूर आणि चंद्रपूर मध्येच होता हे तपासात उघड झाले आहे. चंद्रपूर मध्ये 13 आणि 14 मार्च रोजी तो हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.
advertisement
फरार कोरटकरची मित्रांसोबत पार्टी...
एका बुक्कीने त्याला हॉटेल बुक करून दिले होते. त्या दरम्यान त्याला एक पोलीस अधिकारी भेटला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाही कोरटकर हा 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास कोरटकर हा नागपूर मधील त्याच्या घरी येऊन गेल्याची माहिती तपासात समोर आली. त्याच रात्री काही मित्रांसोबत त्याने स्नेहभोजन केल्याचीही माहिती समोर आली आहे.
advertisement
22 मार्च रोजी कोरटकर सापडत नसल्याने कोल्हापूर पोलिसांचे लूक आउट सर्क्युलर जारी करण्यात आले.गेला महिनाभर पोलिसांना चकवा देणारा प्रशांत कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुकीच्या टीपमुळे पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. प्रशांत कोरटकर हा चंद्रपूर मध्ये लपला असताना ऑनलाइन क्रिकेट सट्टा बुकी धीरज चौधरीने त्याची राहण्याची व्यवस्था केली होती.
11 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता प्रशांत कोरटकर चंद्रपूर मधील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे पोहोचला होता तिथेच मुक्कामी होता. 'न्यूज 18 लोकमत'ने चंद्रपूर मध्ये कोरटकर लपून असलेला असल्याची बातमी प्रसारित करत चंद्रपूर पोलिसांचा कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हॉटेलचे CCTV फूटेज ताब्यात घेत क्रिकेट बुकीं धीरज चौधरीला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला आपल्या खाक्या दाखवाच त्याने कोरटकर बाबत पोलिसांना टीप दिली.
advertisement
कसा पळाला तेलंगणाला...
प्रशांत कोरटकर महिंद्रा एसयूव्ही 700 या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याची माहिती चौधरींना पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे कोरटकर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज लक्कडकोट नाक्यावरील आणि हैदराबाद मार्गावरील सर्व टोल नाके याची तपासणी करण्यात आली.याची माहिती कोल्हापूर पोलिसांना देण्यात आली. कोल्हापूर पोलिसांना मिळालेला माहितीनुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केली.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
March 25, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prashant Koratkar : दोन जिल्ह्यांच्या पोलिसांना चकवा, तेलंगणाआधी महिनाभर कुठं लपून होता कोरटकर? समोर आली मोठी अपडेट