राष्ट्रवादीचा पुढील प्रदेशाध्यक्ष कोण? ३ नावांची चर्चा, शरद पवार कुणाची निवड करणार?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
NCP Next President: राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून मला मुक्त करा अशी विनंती जयंत पाटील यांनी भर कार्यक्रमात केल्याने पुढील प्रदेशाध्यक्ष कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापनदिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश विसरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी, असा प्रण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु याचवेळी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून काहीसे नाट्य रंगले. मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा, असे जयंत पाटील भर कार्यक्रमात म्हणाल्याने पुन्हा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे आणि त्यानंतर विरोधात असतानाची अडीच वर्षे तसेच मागे दोन वर्षे, असा जवळपास सात वर्षांचा कार्यकाळ जयंत पाटील यांनी पूर्ण केला आहे. परंतू यादरम्यान अनेकदा रोहित पवार यांनी जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळाकडे बोट दाखवून नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर शरद पवार यांनीही विचार करून निर्णय घेतो, असे म्हटल्याने राष्ट्रवादीचा पुढील प्रदेशाध्यक्ष कोण, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी ३ नावांच्या चर्चा
राजेश टोपे- मराठवाड्यातील मातब्बर नेते, मराठा समाजाचे आहेत. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणूनही राजेश टोपे यांची ओळख आहे. राजेश टोपे फारसे वादग्रस्त नाहीत. कोरोना काळात चांगले काम केल्यामुळे प्रतिमा चांगली आहे. कोरोना काळातील त्यांच्या कामाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांनी वेधून घेतले होते. शासन प्रशासनात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. संघटनेत देखील ते उत्तम काम करू शकतात.
advertisement
शशिकांत शिंदे- शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीतील एक डॅशिंग आणि आक्रमक नेते आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील नेते. सातारा, नवी मुंबई भागात त्यांचा चांगला होल्ड आहे. अनुभवी नेते असल्याने संधी दिली जाऊ शकते. त्यांच्या नेतृत्वात पक्ष आक्रमकपणे काम करू शकतो.
सुनील भुसारा- सुनील भुसारा हे माजी आमदार आहेत. आदिवासी समाजातून ते येतात. राष्ट्रवादीतला एक सर्वसामान्य चेहरा असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच रोहित पवार यांच्या गटाचे सुनील भुसारा हे तळागळातील कार्यकर्ते आहेत. सुनील भुसारा हे अजिबात वादग्रस्त नाहीत किंबहुना अडचणीत आणता येईल असे त्यांचे कोणतेच प्रकरण नाही. त्यांनी स्वत: प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर दिली जावी, अशी इच्छा व्यक्त केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 10, 2025 9:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीचा पुढील प्रदेशाध्यक्ष कोण? ३ नावांची चर्चा, शरद पवार कुणाची निवड करणार?