agriculture news : फक्त 5 महिने विकली जाते ही भाजी, एक एकर लागवडीतून एकाच हंगामात 5 लाखोंचा नफा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शेतकरी ब्रजकिशोर ठाकुर यांनी याबाबत माहिती दिली, काही शेतकऱ्यांना परसबीची शेती करताना पाहिले होते. त्यांना या माध्यमातून चांगला फायदा होत होता. त्यावेळी त्यांनी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राजकुमार सिंह, प्रतिनिधी
वैशाली : देशात दिवसेंदिवस शेतकरी आता कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तसेच या माध्यमातून शेतीची पद्धतीही बदलत आहे. शेतकरी आता पारंपरिक पिकांपेक्षा आता नगदी पिकांकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त नफा होत आहे. आज अशाच एका शेतकऱ्याची यशस्वी कहाणी जाणून घेऊयात, ज्यांनी एका एकरमध्ये तब्बल 5 लाखांची कमाई केली आहे.
advertisement
किशोर ठाकुर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील अफजलपूर गावात राहतात. त्यांनी पारंपरिक शेतीसोबत भाजीपाल्याची शेती केली. 25 गुंठ्यामध्ये परसबीची शेती करत आहेत. यामाध्यमातून ते दिवसाला 3 हजार रुपये कमावत आहेत.
शेतकरी ब्रजकिशोर ठाकुर यांनी याबाबत माहिती दिली, पटेढी बेलसर गटाच्या करनेजी गावातील शेतकऱ्यांना परसबीची शेती करताना पाहिले होते. त्यांना या माध्यमातून चांगला फायदा होत होता. त्यावेळी त्यांनी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर गावी येऊन आपल्या शेतातील 5 गुंठे जागेत, याची सुरुवात केली. यामध्ये त्यांना चांगला फायदा झाला. यानंतर त्यांनी आपल्या 15 गुंठे आणि मग हंगामात 25 गुंठे एकरात परसबीची शेती केली. यानंतर त्यांचा नफा सातत्याने वाढतो आहे.
advertisement
किती दर मिळतो -
शेतकरी ब्रजकिशोर ठाकुर हे सांगतात की, परसबीची शेती ही पाच महिन्याची आहे. पाच महिने सतत फळधारणा केल्याने नफाही चांगला मिळतो. व्यापारी शेतातून 30 रुपये किलो दराने खरेदी करतात. 15 दिवसांपूर्वीपर्यंत 35 ते 38 रुपये किलोचा दर बाजारात उपलब्ध होता, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्यांना भाजीपाला शेती करायची आहे ते परसबीची शेती करून चांगला नफा मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून परसबीची लागवड सुरू होते. यानंतर डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत फळधारणा प्रक्रिया चालू राहते, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Bihar
First Published :
January 02, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
agriculture news : फक्त 5 महिने विकली जाते ही भाजी, एक एकर लागवडीतून एकाच हंगामात 5 लाखोंचा नफा