घरच्या बिकट परिस्थितीमुळे सोडावे लागले शिक्षण, अमरावतीमधील बीकॉम चायनिजवाला, महिन्याला करतोय 2 लाखांची उलाढाल

Last Updated:

अमरावतीमध्ये शिवराज सुर्यवंशी नावाच्या तरुणाने बीकॉम चायनिज वाला या नावाने चायनिजचे स्टॉल सुरू केले आहे. यामधून तो महिन्याला लाखोंची कमाई करतो.

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी 
अमरावती : अमरावतीमध्ये शिवराज सुर्यवंशी नावाच्या तरुणाने बीकॉम चायनिज वाला या नावाने चायनिजचे स्टॉल सुरू केले आहे. त्यांच्या अमरावती मधील वेगवेगळ्या परिसरात तीन शाखा आहेत. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण सोडून त्याने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी आईच्या नावावर लोन काढून श्री स्वामी समर्थ नावाने चायनिज सेंटर सुरू केले. त्यात त्याला लॉस झाला. तरीही त्याने प्रयत्न करून पुन्हा जोमाने काम सुरू केले आणि आज त्याचे अमरावतीमध्ये तीन दुकान आहेत.
advertisement
अमरावतीमधील व्हीएमव्ही कॉलेज परिसरात असलेला बीकॉम चायनिजवाला शिवराज सुर्यवंशी याच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा तो सांगतो की, माझे शिक्षण बीकॉम फायनलपर्यंत झालेले आहे. घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्याने मला लवकरच कामासाठी बाहेर पडावे लागले. मी बाहेर मिळेल ते काम करत होतो. त्यानंतर मला कामासाठी बाईक आवश्यक होती, त्यामुळे मी आईच्या अकाउंट वरून लोन काढले आणि बाईक घेतली. बाईकचा हपता भरण्यासाठी मी अतिरिक्त काम करत होतो.
advertisement
मग माझी धावपळ पाहून आई म्हणाली की, एखादी वडापावची गाडी सुरू कर. पण मला बनवता येत नव्हते. मग मी खूप विचार करून काही दिवसानंतर श्री स्वामी समर्थ या नावाने चायनिज सेंटर सुरू केले. त्यावर कारागीर म्हणून माझ्या मामाचा मुलगा होता. तो एका हप्त्यात सोडून गेला, मग काय करायचं? तर मी यूट्यूबवर बघून चायनिज बनवत होतो. तेव्हा बिझनेस पूर्ण लॉसमध्ये होता. घरचे सर्वजण मला मदत करत होते. पण तरीही ते काही जमेना, काही दिवसानंतर घरचे पण म्हणत होते बंद करून दे हे काम दुसरं बघ. पण मी प्रयत्न सोडले नाही. त्या परिस्थितीला सामोरे गेलो नंतर हळूहळू टेस्ट येत गेली सर्व ठीक होत गेलं. नंतर मी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीकॉम चायनिजवाला हे नाव ठेवले.
advertisement
काही दिवसानंतर व्यवसाय वाढवण्यासाठी मी दुसरी गाडी सुरू केली. त्यात सुद्धा मला यश आले, त्यानंतर नॉनव्हेज सुरू केले त्यात सुद्धा मला बऱ्यापैकी इन्कम होत आहे. आता माझ्याकडे जे कामगार आहेत त्यांना सगळ्यांना मिळून 50 हजार रुपये दर महिन्याला मला द्यावे लागतात. माझी महिन्याला 1.5 ते 2 लाखांची उलाढाल सध्या होत आहे. शिक्षणाची सुद्धा मला आवड होती. पण परिस्थितीने इकडे आणले. शिक्षण अपूर्ण राहाले मात्र व्यवसायात भरारी घेतली, असे त्याने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
घरच्या बिकट परिस्थितीमुळे सोडावे लागले शिक्षण, अमरावतीमधील बीकॉम चायनिजवाला, महिन्याला करतोय 2 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement