शेअर बाजारात गुंतवणूक करून चूक केली, भारतीय कुटुंबांना आता कळतेय; जुन्या गुंतवणुकीने 1 लाखाचे केले 3 लाख

Last Updated:

Gold vs Stock Market: गेल्या पाच वर्षांत सोन्याची किंमत इतकी वाढली ज्याची फारच कमी लोकांनी कल्पना केली होती. 39,000 प्रति 10 ग्रॅमच्या भावातून सोनं आज 1,15,000 वर पोहोचले आहे आणि गुंतवणूकदारांना तीनपट रिटर्न दिला आहे.

News18
News18
मुंबई: 2020 मध्ये भारतात सोन्याचा भाव सुमारे 39,000 प्रति 10 ग्रॅम होता. आज तो 1,15,000 प्रति 10 ग्रॅमच्या वर पोहोचला आहे. म्हणजे फक्त पाच वर्षांत सोने जवळपास 200% वाढून तीन पट झाले. जर हे कंपाउंडेड पद्धतीने पाहिले, तर याचा परतावा सुमारे 24% वार्षिक (CAGR) येतो. जर याची तुलना बेंचमार्क इक्विटी इंडेक्स निफ्टी 50 सोबत केली, तर त्याने याच कालावधीत सुमारे 17% वार्षिक परतावा दिला. म्हणजे ज्याला लोक "सुरक्षित आहे, पण ग्रोथ देत नाही" असे समजत होते, ते सोने इक्विटीजपेक्षा खूपच चांगले ठरले.
advertisement
गोल्ड वि. स्टॉक मार्केट : 1 लाखावर परतावा
-जर कुणी 2020 मध्ये 1 लाखाचे सोने विकत घेतले असते, तर आज त्याची किंमत जवळपास तीनपट झाली असती.
-2020 मध्ये सोन्याचा भाव 39,000 प्रति 10 ग्रॅम होता.
advertisement
-त्या वेळी 1 लाखांत सुमारे 25.6 ग्रॅम सोने घेता आले असते.
-आता 2025 मध्ये हाच सोनेभाव 1,15,000 प्रति 10 ग्रॅम झाला असल्याने ही गुंतवणूक सुमारे 2.95 लाखांची झाली आहे.
-म्हणजे पाच वर्षांत सोने शांतपणे गुंतवणूकदारांना तीनपट परतावा देऊन गेले.
advertisement
-त्याचवेळी 2020 ते 2025 या काळात निफ्टी 50 ने सरासरी सुमारे 17% वार्षिक परतावा दिला. म्हणजे जर कुणी 2020 मध्ये निफ्टीमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर ती रक्कम पाच वर्षांत सुमारे 2.2 लाखांपर्यंत पोहोचली असती.
अनेक लोक गोल्ड रॅलीतून का चुकले?
advertisement
-बहुतांश गुंतवणूकदार हे सोन्याच्या या रॅलीचा फायदा घेऊ शकले नाहीत.
-काहीजण दर कमी होण्याची वाट पाहत राहिले, पण करेक्शन आलेच नाही.
-काहींनी सोने ही जुनी विचारसरणीची मालमत्ता आहे म्हणून दुर्लक्ष केले. कारण त्यांचे लक्ष स्टॉक्स, स्टार्टअप्स आणि क्रिप्टोवर होते.
advertisement
-त्यामुळे या रॅलीतून फायदा फक्त त्यांनाच झाला ज्यांनी सोने शांतपणे धरून ठेवले होते.
-आज जेव्हा सोने विक्रमी उंचीवर आहे आणि घरांतील दागिने, नाणी यांच्या खऱ्या किमतीची जाणीव लोकांना होत आहे. तेव्हा सर्वांना समजते आहे की त्यांनी किती मोठी संधी गमावली.
शेवटी सोने एवढे का वाढले?
advertisement
सोन्याचा भाव उडण्यामागे अनेक कारणे होती :
महागाई आणि रुपया कमकुवत :
करोनानंतर दैनंदिन वस्तू महागल्या आणि रुपया डॉलरच्या तुलनेत सतत कमकुवत झाला. सोने डॉलरमध्ये ठरते, त्यामुळे रुपया घसरला तसतसे भारतीय खरेदीदारांना जास्त रुपये द्यावे लागले.
सुरक्षित गुंतवणुकीची मागणी :
कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे गुंतवणूकदार असुरक्षित झाले. प्रत्येक संकटाच्या काळात सोने "सेफ हेवन" ठरते, आणि लोक त्यात गुंतवणूक करू लागले.
केंद्रीय बँकांची खरेदी :
या काळात जगभरातील केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने विकत घेतले. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार ही खरेदी अनेक दशकांतील उच्च पातळीवर होती. याचा अर्थ असा की जगातील मोठमोठी वित्तीय संस्थाही सोने सुरक्षित मानत होत्या.
कमी व्याजदरांचा काळ :
महामारीत केंद्रीय बँकांनी व्याजदर कमी केले. त्यामुळे बाँड्स आणि एफडीसारखे पर्याय कमकुवत झाले. सोने तुलनेत अधिक आकर्षक ठरले, कारण त्याला व्याजावर अवलंबून रहावे लागत नाही. म्हणजे सोन्यासाठी सगळीकडून वातावरण पोषक होती. आणि सोने फक्त सुरक्षिततेचे साधन न राहता, जगातील सर्वात वेगाने वाढणारासेट क्लास बनले.
कोणी सर्वाधिक फायदा घेतला?
ज्वेलर्स : सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ज्वेलर्सची संपत्ती अनेक पट वाढली. Hurun India Rich List 2025 नुसार फक्त यावर्षीच ज्वेलरी क्षेत्रात 25 नवीन अब्जाधीश निर्माण झाले. जॉय अलुक्कास यांची नेटवर्थ 88,430 कोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे सोन्याने छोट्या व्यापाऱ्यांना मोठे बिझनेस टायकून बनवले.
भारतीय कुटुंबे : भारत हा जगातील सर्वात मोठा खाजगी सोन्याचा साठा असलेला देश आहे. अंदाजे 25,000 टन सोने भारतीय घरांत आहे. घरांत ठेवलेले हे सोने शांतपणे दुप्पट झाले. अनेकांना याची खरी जाणीव तेव्हा झाली जेव्हा लग्न किंवा कर्जासाठी दागिन्यांचे री-वॅल्युएशन केले गेले. अचानक लोकांना समजले की त्यांचे दागिने व नाणी किती मोठी संपत्ती बनली आहेत.
गुंतवणूकदार : आधी सोने विकत घेण्यास कचरलेले तरुण गुंतवणूकदारही आता ETFs, Sovereign Gold Bonds यांद्वारे सोन्यात गुंतवणूक करू लागले. डिजिटल गोल्ड, पेपर गोल्ड यांसारख्या पर्यायांनीही त्यांना सोय दिली. गोल्ड लोन कंपन्यांनाही फायदा झाला कारण आता लोक अधिक रकमेच्या बदल्यात दागिने तारण ठेवू शकत होते.
गोल्ड रॅलीतून चुकलेल्या लोकांसाठी धडा
सोन्याच्या या रॅलीने गुंतवणूकदारांना काही महत्त्वाचे धडे दिले :
डायव्हर्सिफिकेशन गरजेचे आहे :
सोनं पोर्टफोलियोचा एक भाग असलं पाहिजे, पण सगळं सोन्यात गुंतवू नये. तज्ज्ञांच्या मते 5-10% हिस्सा सोन्यात ठेवणे योग्य आहे.
कसे खरेदी करायचे हे महत्त्वाचे :
जर गुंतवणुकीसाठी घेत असाल तर दागिने घेऊ नका, कारण त्यात मेकिंग चार्ज आणि शुद्धतेचा प्रश्न असतो. नाणी, बार, ETFs, SGB हे चांगले पर्याय आहेत. SGB तर व्याजही देतात.
लांब पल्ल्याचा विचार करा :
सोने कॅश फ्लो देत नाही, त्यामुळे कधी कधी दीर्घकाळ ते स्थिर राहू शकते. 2020 च्या झपाट्याच्या वाढीनंतर जवळपास दोन वर्षे सोने शांत होते. त्यामुळे याकडे ट्रेड म्हणून नाही तर लाँग-टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिले पाहिजे.
लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे
-सोने आपल्या दृष्टीने फक्त दागिने किंवा परंपरा नाही, तर खरी वित्तीय सुरक्षितता आहे. गेल्या चार वर्षांत सोन्याने दाखवून दिले की ते फक्त सुरक्षितच नाही, तर ताकदवानसेटही आहे.
-जर आपल्या पोर्टफोलियोत सोन्याचा हिस्सा 5% पेक्षा कमी असेल, तर हळूहळू गुंतवणूक सुरू करा.
-पण जर 20% पेक्षा जास्त हिस्सा सोन्यात असेल, तर सावध राहा, कारण त्यामुळे इक्विटीजसारख्या ग्रोथसेट्समध्ये आपण चुकू शकता.
-गोल्ड रॅलीचा धडा एकदम स्पष्ट आहे सोन्याला दुर्लक्ष करू नका, पण त्यावर पूर्ण अवलंबूनही राहू नका. संतुलन ठेवूनच पुढे जा.
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारात गुंतवणूक करून चूक केली, भारतीय कुटुंबांना आता कळतेय; जुन्या गुंतवणुकीने 1 लाखाचे केले 3 लाख
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement