महाराष्ट्राशेजारच्या राज्यात बीयरच्या किंमती वाढल्या, एका बीयरसाठी मोजावे लागणार एवढे पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवीन मसुदा नियमांनुसार, बीयर उत्पादनावरचा अतिरिक्त उत्पादन शुल्क (AED) 195% वरून 205% करण्यात आला आहे.
मुंबई: बीयरप्रेमींसाठी वाईट बातमी आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यात किंमती वाढल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात थंडगार बीयरला भाववाढीची झळ बसली आहे. त्यामुळे नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. कर्नाटकमधील बीयरप्रेमींना मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारने बीयरवर लागणाऱ्या उत्पादन शुल्कात तब्बल 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बीयरच्या किंमतीत थेट वाढ होणार आहे.
नवीन मसुदा नियमांनुसार, बीयर उत्पादनावरचा अतिरिक्त उत्पादन शुल्क (AED) 195% वरून 205% करण्यात आला आहे. सरकारचा उद्देश करप्रणाली सुलभ करणे असला, तरी याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. या निर्णयामुळे प्रीमियम ब्रँडच्या बीयरच्या प्रति बाटली किंमतीत सुमारे 10 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, तर स्थानिक कमी किंमतीच्या बीयरमध्ये 5 रुपयांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
या दरवाढीचा परिणाम ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर निश्चितपणे होईल. यापूर्वी राज्यात दुहेरी कर प्रणाली होती – काही बीयर ब्रँडवर ₹130 प्रति लिटर निश्चित कर लागू होता, तर काहींवर टक्केवारीनुसार आकारणी केली जात होती. आता हे दोन्ही प्रकार रद्द करून एकसमान 205% उत्पादन शुल्क लागू करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये बीयरच्या किंमतीत गेल्या तीन वर्षांत तीनदा वाढ झाली आहे.
advertisement
जुलै 2023 मध्ये काँग्रेस सरकारने AED 175% वरून 185% केला होता. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये AED 195% पर्यंत वाढवण्यात आला आणि आता एप्रिल 2025 मध्ये तो 205% वर पोहोचला आहे. याशिवाय बीयरच्या बेस एक्साइज ड्युटीतही त्या काळात सुधारणा करण्यात आली होती. कर्नाटक राज्य बीयरच्या उत्पादन आणि खपामध्ये देशात आघाडीवर आहे.
advertisement
दरवर्षी सुमारे 3.8 मिलियन हेक्टोलिटर बीयरचा खप राज्यात होतो, जो देशाच्या एकूण खपाच्या सुमारे 12% इतका आहे. मात्र सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे राज्यातील बीयर विक्रेत्यांमध्ये विक्री घटण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्राहकांना दरवाढीचा फटका बसल्याने बीयरच्या मागणीत घट येण्याची शक्यता आहे.
Location :
Karnataka
First Published :
May 01, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
महाराष्ट्राशेजारच्या राज्यात बीयरच्या किंमती वाढल्या, एका बीयरसाठी मोजावे लागणार एवढे पैसे