Women Success Story: 5 हजारांची गुंतवणूक, सुरू केला फायद्याचा व्यवसाय, ममता कमवतात महिन्याला 1 लाख रुपये! Video

Last Updated:

Women Success Story: ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या व्यवसायातून आज दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई सुरू केली आहे.

+
५

५ हजारांत सुरू केलेला व्यवसाय, आज महिन्याला १ लाख कमावणाऱ्या ममता कांबळे यांची प्रेरणादायी वाटचाल

ठाणे: सध्याच्या घडीला अनेक महिला व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. बदलापूरच्या ममता कांबळे यांनी केवळ 5 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या सुगंधी मेणबत्त्यांच्या व्यवसायातून आज दरमहा 1 लाख रुपयांहून अधिक कमाई सुरू केली आहे. 7K Candle या नावाने त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला असून, त्यांच्या कँडल्स आणि रूम फ्रेशनर्सची मागणी देशभरातच नव्हे तर स्वित्झर्लंड, कॅनडा, अमेरिका अशा परदेशांमधूनही होत आहे.
मुळात एका खासगी बँकेत नोकरी करणाऱ्या ममता कांबळे यांना नेहमीच काहीतरी स्वतःचं करण्याची खंत वाटत होती. शेवटी त्यांनी नोकरीला रामराम ठोकत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी घरूनच सुगंधी मेणबत्त्या तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात काम सुरू केलं, मात्र दर्जा आणि वेगळेपणावर भर दिल्यामुळे ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
advertisement
7K Candle या ब्रँडअंतर्गत आज विविध प्रकारच्या आकर्षक आणि दर्जेदार सुगंधी मेणबत्त्या, रूम फ्रेशनर्स उपलब्ध आहेत. या उत्पादनांची खासियत म्हणजे त्यातील सर्जनशील डिझाईन्स जसे की मोदक, मोतीचूर लाडू, काजू कतली, विविध फुलांचे बुके, चहा-बिस्किटं, कॉफी अशा थीम्समध्ये तयार केलेले मेणबत्त्यांचे सेट आहेत. यामध्ये नैसर्गिक घटक आणि सुगंधी तेलांचा वापर करण्यात येतो, त्यामुळे हे उत्पादन पर्यावरणपूरकही ठरते.
advertisement
घर, ऑफिस तसेच गिफ्टिंगसाठी या उत्पादनांची मागणी वाढत असून सण-उत्सवांच्या काळात तर विक्री दुपटीने वाढते. ममता कांबळे यांचा प्रवास हे कमी गुंतवणुकीतून मोठं यश मिळवण्याचं आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभं राहण्याचं उत्तम उदाहरण आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: 5 हजारांची गुंतवणूक, सुरू केला फायद्याचा व्यवसाय, ममता कमवतात महिन्याला 1 लाख रुपये! Video
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement