Success Story: आयटीतील उच्च पगाराची नोकरी सोडली, आता तरुण विकतोय वडापाव, महिन्याला कमाई लाखात! Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Success Story: शेखर देवरे यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून वडापाव व्यवसाय सुरू केला आहे. यामधून महिन्याकाठी 2 लाखांपेक्षा अधिक कमाई ते करत आहेत.
पुणे : अनेक तरुणांचे स्वप्न असते की आयटी क्षेत्रात चांगली नोकरी मिळावी, उत्तम पगार असावा आणि कॉर्पोरेट आयुष्य जगता यावं. पण धुळे जिल्ह्यातील शेखर देवरे या तरुणाने हा मार्ग न निवडता, आयटी क्षेत्रात मिळालेल्या अनुभवातून काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. चार वर्षे आयटी क्षेत्रात काम करून आणि 50 हजारांहून अधिक पगार असलेली नोकरी सोडून त्यांनी पुण्यात कर्वेनगर भागात वडापावचा व्यवसाय सुरू केला आहे.
शेखर यांना नेहमी वाटत होतं की कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. त्यांनी एक वर्षभर विविध व्यवसायांवर संशोधन केलं, बाजारपेठ समजून घेतली आणि शेवटी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यपदार्थावर विश्वास ठेवत वडापाव व्यवसायाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
शेखर यांनी फ्रँचायजी मॉडेलचा अभ्यास करून त्याआधारे व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा वडापाव व्यवसाय कर्वेनगरमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वड्यांसोबत दिला जाणारा ठेचा आणि चिंच-गुळाची चटणी ही ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वडापावची किंमत 18 रुपये असून, दिवसाला सुमारे 400 ते 500 वडे विकले जात आहेत. यामधून महिन्याकाठी 2 लाखांपेक्षा अधिक कमाई ते करत आहेत.
advertisement
सुरुवातीला भीती वाटत होती की आपल्याला हे जमेल का? पण मी ठरवलं होतं की मेहनत करून व्यवसाय उभा करायचा. आयटीमधील अनुभवाचा वापर मी व्यवस्थापनात आणि मार्केटिंगमध्ये करत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढतो आहे, असं शेखर सांगतात.
धाडस, चिकाटी आणि चांगला दृष्टिकोन असला की कोणतीही कल्पना यशस्वी करता येते. पैशाच्या मागे न धावता, स्वतःच्या आवडीत आणि कल्पनेतूनच मोठं काहीतरी घडवता येतं, अशा भावना शेखर यांनी व्यक्त केल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 14, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: आयटीतील उच्च पगाराची नोकरी सोडली, आता तरुण विकतोय वडापाव, महिन्याला कमाई लाखात! Video