ATM मधून पैसे कढताना ट्रांझेक्शन फेल झालं पण अकाउंटमधून पैसे वजा झाले? 24 तासांच्या आत करा हे काम

Last Updated:

अनेक वेळा ATM मधून पैसे काढताना रोख रक्कम काढली जात नाही, तर खात्यातून पैसे कापले जातात. असे काही तुमच्या बाबतीत घडले तर काळजी करण्याची गरज नाही. येथे नमूद केलेल्या पद्धती वापरून पहा...

एटीएम
एटीएम
नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटचं चलन झपाट्याने वाढल्यामुळे आजच्या काळात जास्तीत जास्त लोक कॅशलेस राहणे पसंत करतात. मात्र तरीही कधीना कधी कॅशची गरज पडतेच. ज्यामुळे लोक एटीएममधून ट्रांझेक्शन करतात. कॅश काढण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. तसं तर एटीएम खूप सुविधाजनक आहे. मात्र अनेकदा हे तुम्हाला अडचणीत टाकतता. ठग क्लोन बनवून एटीएमची फसवणूक करतात, अशा परिस्थितीत सावध राहण्याची गरज आहे.
याशिवाय, काहीवेळा ATM मधून पैसे काढताना कॅश निघत नाही, परंतु तुमचे पैसे अकाउंटमधून कापले जातात. असे काही तुमच्या बाबतीत घडले तर काळजी करण्याची गरज नाही. येथे नमूद केलेल्या काही पद्धती वापरून पहा, तुमची कट केलेली रक्कम काही दिवसात परत केली जाईल.
SMS ने मिळते माहिती
अनेक वेळा टेक्निकल बिघाडामुळे ATM मधून पैसे काढले जात नाहीत. एटीएम तुमचं ट्रांझेक्शन नाकारतं, तरीही तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून पैसे कट झाल्याचा एसएमएस येतो. ही एक गंभीर परिस्थिती आहे. अशा वेळी काढलेली रक्कम मोठी असते तेव्हा अधिक चिंताजनक वाढे. तसं तर पैसे कट झाले तर ते आपोआप तुमच्या खात्यात जमा होतात. परंतु काहीवेळा हे फसवणुकीमुळे घडू शकते, ज्यामध्ये फसवणूक करणारे एटीएममध्ये छेडछाड करतात आणि त्याचा वापर करून तुमचे कार्ड 'क्लोन' करतात आणि नंतर तुमच्या अकाउंटमधून पैसे काढले जाऊ शकतात.
advertisement
असं झाल्यास तत्काळ करा हे काम
अशा परिस्थितीत, तुम्ही सर्वप्रथम बँक कस्टमर केअरशी संपर्क साधावा. यासाठी बँकेच्या 24 तास ग्राहक सेवा हेल्पलाइनवर कॉल करावा लागेल. असे केल्याने तुमची समस्या नोट केली जाईल आणि तुमचा व्यवहार संदर्भ क्रमांक रेकॉर्ड केल्यानंतर, कार्यकारी तुमची तक्रार नोंदवेल आणि तुम्हाला तक्रार ट्रॅकिंग नंबर जारी करेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, या स्थितीत सात कामकाजाच्या दिवसांत ग्राहकाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट जमा केले जावे.
advertisement
भरपाईचीही आहे तरतूद
तुमच्या अकाउंटमधून डेबिट केलेली रक्कम बँकेने निर्धारित वेळेत परत न केल्यास नुकसानभरपाईची तरतूद आहे. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेला 5 दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करावे लागते. या कालावधीत बँकेने समस्येचे निराकरण केले नाही तर प्रतिदिन 100 रुपये भरपाई द्यावी लागेल. तरीही तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही https://cms.rbi.org.in वर तक्रार नोंदवू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ATM मधून पैसे कढताना ट्रांझेक्शन फेल झालं पण अकाउंटमधून पैसे वजा झाले? 24 तासांच्या आत करा हे काम
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement