Samruddhi Expressway Block : समृद्धी महामार्गावर 5 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरु?
Last Updated:
Samruddhi Expressway Traffic Block : समृद्धी महामार्गावर आयटीएमएस गॅन्ट्री उभारणीसाठी जानेवारीदरम्यान काही दिवस टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या महामार्गावर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम उभारण्याचे काम सुरू आहे. या यंत्रणेसाठी महामार्गावर मोठ्या लोखंडी गॅन्ट्री उभारण्यात येत असून त्यासाठी काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत हे काम करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गावर 5 दिवस ब्लॉक
गॅन्ट्री उभारणीचे काम एकूण 10 टप्प्यांत केले जाणार असून प्रत्येक टप्प्यात संबंधित वाहिनीवरील वाहतूक साधारण 45 मिनिटे ते 1 तास पूर्णपणे बंद ठेवली जाईल. काम पूर्ण होताच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
'या' दिवशी असणार बंद
एमएसआरडीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जानेवारी ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील समृद्धी महामार्गावरील काही मार्गांचा समावेश आहे.
advertisement
या कामामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ नये यासाठी ब्लॉकचे वेळापत्रक नियोजनपूर्वक केले गेले आहे. तरीही प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी प्रवासापूर्वी पर्यायी मार्गांचा विचार करावा असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवाशांना रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स, वेग नियंत्रण आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 8:24 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Samruddhi Expressway Block : समृद्धी महामार्गावर 5 दिवसांचा ब्लॉक; जाणून घ्या कुठे असेल बंद अन् कुठे असेल सुरु?










