Devendra Fadnavis : ठाण्यात वाहतूक कोंडी का आहे? प्रश्न कधी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांचं रोड प्लॅनिंग ऐकून थक्क व्हाल!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रोडमॅप तयार केला आहे.जर रोडमॅपनुसार काम झालं तर निश्चितच वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण रोडमॅप काय आहे? हे जाणून घेऊयात.
Devendra Fadnavis Interview : गेल्या काही दिवसांपासून ठाणे घोडबंदर रोड आणि मुंबईवरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतुक कोंडीची समस्या नागरीकांना आणि वाहन चालकांना भेडसावत आहे. या समस्येचा निपटारा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक रोडमॅप तयार केला आहे.जर रोडमॅपनुसार काम झालं तर निश्चितच वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे हा संपूर्ण रोडमॅप काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
ठाण्यातील 'आपलं ठाणे, आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी ठाण्यात होणाऱ्या वाहतुक कोंडीवर भाष्य केले आहे.
advertisement
जुन्या सरकारच्या काळात 11 किलो मीटर मेट्रो होती. आम्ही 415 किलो मीटर मेट्रो सुरू केली. आता 475 पैकी 50 किलो मीटर टप्यात काम करत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच रिंग मेट्रो देखील ठाण्यात होत आहे. अनेक जण लटकून प्रवास करतात यावर आपण आता लोकल ट्रेन साठी वातानुकूलित आणि बंद डब्ब्याची लोकल सेवेत आणत आहोत. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही तिकीटीच्या दरात वाढ होणार नाही आहे, तेच दर असणार आहेत,असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या लोकल प्रवाशांनाही खुशखबर दिली. एकच तिकिटावर तुम्ही संपूर्ण मुंबई मेट्रो पॉलिटन शहरा मध्य फिरतात येणार आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
पहिल्या टप्प्यात मध्ये ठाणेकरांना 2 वर्षा मध्ये मेट्रो ट्रेन मध्ये प्रवास करता येईल. बुलेट ट्रेनसाठी आपण जर पाहिल तर मागील सरकारमध्ये जिना होते, ज्यांनी बुलेट ट्रेनला पूर्ण स्थगिती दिली होती. गुजरातला काम चालू होतं पण महाराष्ट्र मध्ये काम चालू नव्हता पण आमचा सरकार आल्याने आम्ही बुलेट ट्रेनला चालना दिली,असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
advertisement
ठाण्यात कोपरी पासून कोस्टल रोड आपण बांधत आहोत. ठाण्यातील घोडबंदर रोड, नाशिक हायवेवरला ट्रॅफिक आणि भिवंडी मधला ट्रॅफिक सर्व मोकळा होणार आहे. कोस्टल रोड झाल्यावर 23 किलोमीटरचा ट्विंग टनल, ठाणे बोरिवली टनल बांधत आहे आणि पहले जे 2 तास जात होता ते आता १५ ते २० मिनिट मध्ये गोरेगाव जातात येणार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
ठाणे घोडबंदरवर वाहतुक कोंडी का होते?
ठाणे घोडबंदरवरून सर्व वाहतुक जेएनपीटीवरून गुजरातला जाते त्यामुळे त्या रस्त्यावर वाहतुक कोंडी होते.मुंबईचा कोस्टल रोड हा भाईंदर ते विरार आणि विरार ते अलिबाग पर्यंत जाणार आहे. वसई आणि ठाणे खाडी कोस्टल रोड तयार करत आहोत. खारेगाव ते गायमुख पर्यंत काम जवळ पास होत आले आहे.कोपरी ते बालकुम आणि साकेत असा कोस्टल रोड होत आहे. छेडा नगर आमने,भिवंडी वेगळी लिंक कशेळी आमने भाईंदर मुंबई ला कोस्टल रोड तयार करत आहे. शहरातील ट्रॅफिक शहरात राहील.बाहेरचे ट्रॅफिक बाहेर जाईल अशी कनेक्टविटी आम्ही प्लान केला आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 9:41 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Devendra Fadnavis : ठाण्यात वाहतूक कोंडी का आहे? प्रश्न कधी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांचं रोड प्लॅनिंग ऐकून थक्क व्हाल!









