महापालिका निवडणुकीला रक्ताचा डाग, दोन हत्या आणि तीन जीवघणे हल्ल्ले; महाराष्ट्रात न पाहिलेलं 'जंगलराज'

Last Updated:

प्रचाराच्या रणधुमाळीत दोन हत्या आणि तीन जीवघेणे हल्ले झाल्याने लोकशाहीचा उत्सव रक्तपाताने माखला असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे.2017 नंतर तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांनी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच, या निवडणुकांना हिंसाचाराची काळी किनार लागली आहे. प्रतिष्ठेच्या लढतीमुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले असताना, निवडणूक इतिहासात ‘जंगलराज’ नसलेल्या महाराष्ट्रातच आता तेच चित्र दिसू लागले आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत दोन हत्या आणि तीन जीवघेणे हल्ले घडल्याने संपूर्ण राज्य हादरले असून, लोकशाहीचा उत्सव रक्तपाताने माखला असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.
महाराष्ट्राने निवडणुकीच्या इतिहास यंदाची महापालिका निवडणूक निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण राज्यात प्रचंड हिंसा झाली. सोलापूरमध्ये मनसे नेते सरवदे हत्या, खोपोलीत मंगेश काळोखे हत्या, संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हल्ला, अकोल्यात हिदायत पटेल खून बांद्रा येथे शिवसेना उमेदवार हल्ला याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

मनसे नेते सरवदे यांची हत्या

advertisement
मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची अर्ज मागे घेण्याच्या वादातून हत्या झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि अपक्ष उमेदवार रेखा सरवदे यांच्यातील वादातून हा प्रकार घडला. रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर मिरचीपूड टाकून कोयता, चाकू आणि गुप्तीने वार करण्यात आले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भाजप उमेदवारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
advertisement

खोपोली काळोखे हत्या

खोपोली नगरपरिषदेच्या नवर्निवाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर 2025 ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या राजकीय वादातून झाल्याचा दावा करण्यात येत असतानाच शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचे नाव घेतले होते.
advertisement

इम्तियाज जलील हल्ला

छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा जिन्सी या भागात घडली आहे. एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील प्रचारासाठी आले असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न केला. धावत्या कारच्या आतमध्ये हात घालून जलील यांना मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. जलील यांना कार बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान वाहनाच्या बाहेर लटकलेल्या जलील यांच्या समर्थकांनाही मारहाण करण्यात आलीय. जलील यांच्या कारच्या चालकानं समयसूचकता दाखवल्यानं अनर्थ टळला आहे.
advertisement

हिदायत पटेल हत्या 

अकोट तालुक्यातील मोहोळ या त्यांच्या गावी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला होता. हिदायत पटेल व मोहोळ गावातीलच एका पटेल कुटुंबीयांसोबत त्यांचे बऱ्याच वर्षापासून राजकीय भांडण होतं, याच भांडणातून विरुद्ध गटाच्या उबेद पटेल नावाच्या एका तरुणाने हिदायत पटेल यांच्यावर काल चाकू हल्ला केला. नमाजानंतर हिदायत पटेल मोहोळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेदनं हिदायत पटेल यांच्यावर चाकू अचानक हल्ला केला.
advertisement

सालिन कुरेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला

मुंबईतत वॉर्ड क्रमांक 92 मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 92 चे उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. एका अज्ञात इसमाने हाजी सालिन कुरेशी यांच्या पोटात चाकू भोसकल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरात घडली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी हाजी सालिन कुरेशी यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महापालिका निवडणुकीला रक्ताचा डाग, दोन हत्या आणि तीन जीवघणे हल्ल्ले; महाराष्ट्रात न पाहिलेलं 'जंगलराज'
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement