Rohit Sharma : 'रोहित भैय्या, वडापाव पाहिजे का?', चाहत्याची मराठीमध्ये ऑफर, हिटमॅनचं भन्नाट उत्तर, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिज आधी रोहित शर्मा जोरदार सराव करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी दोन मॅच खेळलेला रोहित रविवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी मैदानात उतरेल.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिज आधी रोहित शर्मा जोरदार सराव करत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी दोन मॅच खेळलेला रोहित रविवारपासून न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजसाठी मैदानात उतरेल. या सीरिजसाठी सराव करत असताना रोहित शर्माला चाहत्याकडून वडा पावची ऑफर देण्यात आली, पण ही ऑफर रोहित शर्माने नाकारली.
टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झाल्यापासून, रोहितचे लक्ष त्याच्या फिटनेसवर आहे. मागच्या काही काळात रोहितने त्याचं वजन कमालीचं कमी केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, रोहित सराव सत्रासाठी तयार होताना दिसत होता, तेव्हा एका चाहत्याने त्याला मराठीत विचारले की त्याला वडा पाव खायला आवडेल का. "रोहित भैया, वडापाव पहिजे का?" असे चाहत्याने म्हटले. पण, रोहितने चाहत्याची ही ऑफर नाकारली आणि नाही म्हणत हात हलवला.
advertisement
After the practice session ended, when Rohit Sharma came out, the fans jokingly said, "Rohit bhaiya, vadapav pahije ka" and
Rohit just waved his hand and replied, "No"
bRO always enjoy with his fans pic.twitter.com/euco1nvMqs
— (@rushiii_12) January 6, 2026
advertisement
रोहित शर्मासाठी 2025 हे वर्ष संस्मरणीय ठरले. कर्णधार म्हणून रोहित शर्माने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिली. फायनलमध्ये रोहितने 76 रनची महत्त्वाची खेळी केली. रोहित शर्मा हा त्याच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. तसंच वनडेमध्ये सर्वाधिक रन करणारा भारताचा तिसरा खेळाडू बनला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार रन करणारा रोहित चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला. गेल्या महिन्यात विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात त्याने ही कामगिरी केली.
advertisement
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्येच वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक सिक्स मारण्याचा शाहिद आफ्रिदीचा विक्रमही मोडला. शाहिद आफ्रिदीचा वनडे क्रिकेटमधल्या 351 सिक्सचा विक्रम रोहिते मोडित काढला. रोहितने 279 वनडे सामन्यांमध्ये 355 सिक्स मारले आहेत.
रोहित शर्माने 2025 मध्ये 14 इनिंगमध्ये 50 च्या सरासरीने आणि 100 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 650 रन केल्या. यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश होता. नाबाद 121 रन ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. मे महिन्यात रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 9:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'रोहित भैय्या, वडापाव पाहिजे का?', चाहत्याची मराठीमध्ये ऑफर, हिटमॅनचं भन्नाट उत्तर, Video











