ठाण्यात राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा, शाखांना भेटी, उमेदवारांना कानमंत्र

Last Updated:

ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ह्या शिलेदाराना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः राज ठाकरे व्यक्तीशः उमेदवारांना भेटण्यासाठी ठाण्यात येत आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखांना भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी (ता. ०८ जाने.) रोजी सायंकाळ ५ वाजता ठाण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या पक्ष कार्यालय व शाखेला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या खेपेला ठाण्यात चमत्कार घडवण्याचा चंग बांधला आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेने २८ सुशिक्षित मराठी उमेदवार मैदानात उतरवले आहेत. ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या ह्या शिलेदाराना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः राज ठाकरे व्यक्तीशः उमेदवारांना भेटण्यासाठी ठाण्यात येत आहेत. सायंकाळी ५ वाजल्यापासुन राज ठाकरे यांचा दौरा प्रारंभ होणार आहे.
advertisement
१.प्रभाग क्रमांक १९ - मनसे उमेदवार प्रमिला विकास मोरे इटरनिटी मॉल, तीनहात नाका, ठाणे.
२. प्रभाग क्रमांक १७ - मनसे उमेदवार सौ. पूजा किरण ढमाळ किसन नगर नाका ठाणे.
३. प्रभाग क्रमांक १६ - मनसे उमेदवार रश्मी राजहंस सावंत आणि मनसे उमेदवार आरती रोशन पाटील, आयटीआय सर्कल वागळे इस्टेट, ठाणे.
advertisement
४. प्रभाग क्रमांक १५ - मनसे उमेदवार पवन पडवळ, साठे नगर नाका, वागळे इस्टेट.
५. प्रभाग क्रमांक ०७ - मनसे उमेदवार स्वप्नाली खामकर (पाचंगे) पक्ष कार्यालय साईबाबा मंदिर जवळ, वर्तक नगर नाका.
६. प्रभाग क्रमांक ०५ - मनसे उमेदवार पुष्कराज विचारे, पक्ष कार्यालय श्री समर्थ सोसायटी गजानन महाराज मंदिर रोड, शिवाई नगर, ठाणे.
advertisement
७. प्रभाग क्रमांक ०४ - मनसे उमेदवार कु. प्रतीक्षा डाकी टाइटन हॉस्पिटल, मानपाडा, ठाणे.
८. प्रभाग क्रमांक ०२ - कु. अभिषेक रजक,  मनसे शाखा वामन नगर वाघबीळ ठाणे. आणि मनसे उमेदवार रविंद्र मोरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार कविता पाटील यांचे निवडणूक कार्यालय ब्रमांड सर्कल.
९. प्रभाग क्रमांक ०३  - मनसे उमेदवार निलेश चव्हाण पक्ष कार्यालय मनोरमा नगर मानपाडा.
advertisement
१०. प्रभाग क्रमांक ०८ - मनसे उमेदवार सचिन कुरेल माजिवडा सर्कल.
११. प्रभाग क्रमांक १२ - मनसे उमेदवार  सौ. रक्षा दिनेश मांडवकर  मनसे नाका, पाचपाखाडी. उमेदवार रूपेश जाधव मनसे शाखा टेकडी बंगला.
१२. प्रभाग क्रमांक २२ - मनसे उमेदवार रविंद्र सोनार पक्ष कार्यालय, पितृ छाया सोसायटी राघोबा शंकर पथ, फूल मार्केट.
advertisement
१३. प्रभाग क्रमांक २० - मनसे उमेदवार सौ. सविता मनोहर चव्हाण आणि मनसे उमेदवार सौ.राजश्री सुनील नाईक अष्टविनायक चौक, कोपरी.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्यात राज ठाकरे यांचा झंझावाती दौरा, शाखांना भेटी, उमेदवारांना कानमंत्र
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement