Dharavi: धारावी पुनर्विकास प्रकल्पाची मोठी बातमी, अक्सा मालवणी जमिनीसाठी TOR दाखल 

Last Updated:

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अक्सा मालवणी जमिनीसाठी TOR दाखल झाला असून डीआरपीने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू केली आहे.

News18
News18
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जमीन संपादन प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका आज गुरुवारी फेटाळली आणि पाठोपाठ मोठी घडामोड समोर आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अक्सा मालवणी जमिनीसाठी TOR दाखल झाला असून डीआरपीने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया सुरू केली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. महाराष्ट्र सरकार आणि अदानी समुहाच्या संयुक्त उपक्रमाने धारावीच्या बाहेरील महत्त्वाच्या पुनर्वसन स्थळांपैकी एकासाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्याच्या दिशेनं पहिलं औपचारिक पाऊल उचलले आहे.
ही जागा आहे अक्सा-मालवणी येथे 140 एकरचा भूखंड. नवभारत मेगा डेव्हलपर्स ह्या विशेष उद्धेश वाहनाने पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे (MoEF&CC) संदर्भ अटी किंवा TOR दाखल केल्या आहेत. कोणतेही बांधकाम होण्यापूर्वी तपशीलवार पर्यावरणीय तपासणीसाठी हा प्रारंभ बिंदू मानला जातो. 11 ऑक्टोबर 2024 च्या राजपत्रित अधिसूचनेवर आधारित हे फायलिंग, प्रकल्पासाठी प्रस्तावित 140 एकर जमिनीच्या वाटपाचं समर्थन करीत असल्यानं ही नक्कीच मोठी घडामोड समोर आली आहे.
advertisement
मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या या जमिनीवर धारावीमध्ये इन-सीटू घरांसाठी पात्र नसलेल्या रहिवाशांना राहण्याची अपेक्षा आहे. तज्ञांच्या मते, हा अद्याप बांधकामासाठी हिरवा कंदील नाही. परंतु यामुळे पर्यावरण पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू होते. ही एक प्रारंभिक पायरी आहे. अर्थातच डिझाइन किंवा जमीन-वापराची, याला मान्यता म्हणता येणार नाही. परंतु, पुढील मंजुरी देण्यापूर्वी संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी CRZ, नागरी विमान वाहतूक आणि राज्य पर्यावरण विभाग यांसारख्या बहु-एजन्सी, या मूल्यांकनास चालना देते. पर्यावरण मंजुरी मिळविण्यासाठी टीओआर सबमिशन ही पहिलं औपचारिक पाऊल म्हणता येईल.
advertisement
ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यासाठी सामान्यत: 6 ते 7 महिने लागतात. हे बिल्ट-अप क्षेत्र, हिरवीगार जागा, रहदारी अभिसरण आणि पर्यावरणीय सुरक्षा या सारखे प्रकल्प तपशील देते. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही जागा सर्व पर्यावरणीय मंजुऱ्या मिळाल्यानंतर धारावी प्रकल्पासाठी इतर सर्व वाटप केलेल्या जमिनींप्रमाणेच संपूर्ण पायाभूत सुविधांसह विकसित केली जाईल. या जमिनींमध्ये पुनर्वसन केलेले रहिवासी नेहमीच त्याच्या परिसंस्थेशी जोडलेले राहतील. एकदा टीओआर मंजूर झाल्यानंतर, संपूर्ण पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन केले जाईल. जे लाखो धारावी कुटुंबीय अजूनही त्यांच्या स्वत:च्या घराची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी हे कागदोपत्री कामापेक्षा बरंच अधिक आहे. ही एक सन्माननीय जीवनासाठी वास्तविक बदलाची सुरुवात आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Dharavi: धारावी पुनर्विकास प्रकल्पाची मोठी बातमी, अक्सा मालवणी जमिनीसाठी TOR दाखल 
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement