Coastal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये अपघात झाल्यास तात्काळ मदत मिळणार

Last Updated:

Coastal Road: काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये एका कारला आग लागली होती. अग्निशमन दलाला माहिती वेळेवर मिळाल्याने कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण सोप्प झालं होतं. बोगद्यातील १० क्रॉस पॅसेजेसमुळे तात्काळ मदत पोहोचू शकली.

Coastal Road: मुंबईकर कोस्टल रोड 24 तास आपलाच, पादचारी भुयारी मार्गही सुरू
Coastal Road: मुंबईकर कोस्टल रोड 24 तास आपलाच, पादचारी भुयारी मार्गही सुरू
गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन झालं. मुंबईकरांसाठी सोयीस्कर ठरलेला हा कोस्टल रोड सध्या रस्ते अपघातामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून या रस्त्यावर 2 ते 3 अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बोगद्यामध्ये एका कारला आग लागली होती. अचानक कारने पेट घेतल्यामुळे काही वेळेसाठी परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं. अग्निशमन दलाला माहिती वेळेवर मिळाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण सोप्प झालं होतं. बोगद्यातील १० क्रॉस पॅसेजेसमुळे तात्काळ मदत पोहोचू शकली.
दरम्यान, बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी हे क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. या क्रॉस पॅसेजेसमुळे संपूर्ण बोगद्यातून प्रवास न करता या क्रॉस पॅसेजेसमधून एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. कोस्टल रोडवरील प्रवासासाठी 2072 किलोमीटरचे दोन बोगदे खंदण्यात आले आहेत. 11 मीटर लांबीवर 10 क्रॉस पॅसेजेस या बोगद्यात आहेत, याची उंची साडेचार मीटर आहे. या क्रॉस पॅसेजेसमधून आपत्कालीन परिस्थतीत वाहनांना आणि प्रवाशांना बाहेर काढता येणे शक्य होणार आहे.
advertisement
बोगद्याच्या भिंती या अतिउच्च तापमान सहन करू शकतील, अशा बांधल्या आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनाला आग लागल्याची घटना घडल्यास 900 सेल्सिअसपर्यंत तापमान बोगदा आणि भिंती सहन करू शकतात. बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे कॉंक्रीटचे अस्तर लावण्यात आले असून, त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाय योजनेंतर्गत अग्निरोधक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’ देखील उभारण्यात आले आहेत. याशिवाय प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ रूग्णवाहिका आणि इमर्जन्सी फायर ब्रिगेड व्हेईकल तैनात करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, कोस्टल रोडवर आगीची दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत म्हणून बोगद्यात 3 किमी लांबीचे फायर हायड्रंट बसवण्यात आले आहेत. अग्निशमन दल आपत्ती प्रतिसाद वाहनाचा वापर करून तत्काळ आग विझवता येईल. यासाठी प्रियदर्शनी पार्क येथे पालिकेकडून बोगद्याच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या टेक्निकल इमारतीजवळ फायर टँक बांधण्यात आले आहेत. यामध्ये सव्वाचार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Coastal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये अपघात झाल्यास तात्काळ मदत मिळणार
Next Article
advertisement
Shah Rukh Khan : अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना मागे टाकत शाहरुख बनला अब्जाधीश
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
    View All
    advertisement