Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Last Updated:

Ujjwal Nikam : उज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे.

उज्ज्वल निकम
उज्ज्वल निकम
मुंबई : उत्तर मध्य मुंबईत महायुतीचे भाजपा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान राडा झाल्याचं समोर आलं आहे. उज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. शिवसेना कार्यालयासमोरुन प्रचार यात्रा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील गद्दार म्हणून हिणवले. त्यावरुन दोन्ही गटांचे कार्यकर्ते ऐकमेकांना भिडले.
उत्तर मध्य मुंबईत महायुतीकडून प्रचाराचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याचा एक भाग म्हणून प्रचार रॅली काढण्यात आली होती. ही यात्रा खारदांड्याजवळ असलेल्या शिवसेना कार्यालयावरुन जात होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उत्तरादाखल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गद्दार म्हणून घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याने राडा झाला.
advertisement
निकम यांची संपत्ती किती?
उज्ज्वल निकम यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 21.57 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यात निवासी अपार्टमेंट आणि शेतजमीनीचा समावेश आहे. तर 34 लाख रुपये रोख, 740 ग्रॅम सोने आणि 11 किलो चांदी आहे. निकम यांनी आपल्यावर 6 लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले आहे. पूनम महाजन यांचे तिकीट कापून भाजपने उत्तर मध्य मतदारसंघातून निकम यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थानही याच भागात येते. 71 वर्षीय उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या माहीम येथील घराचा कायम पत्ता म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखल किंवा प्रलंबित नसल्याचे निकम यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement