नाशिकमधील पारा घसरला, पुण्यात धुके, पाहा हवामान अपडेट

Last Updated:

31 जानेवारीला राज्यातील वातावरण कोरडे असणार आहे. नाशिक मधील किमान तापमानात घट झाली आहे. इतर भागांत धुके पडण्याची शक्यता आहे. 

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील विविध भागांत सध्या ढगाळ वातावरण असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे. 31 जानेवारीला नाशिकमधील किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. इतर ठिकाणी किमान तापमानात वाढ कायम आहे. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
advertisement
31 जानेवारीला मुंबई शहर आणि उपनगरात धुके पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
advertisement
पुण्यामध्ये 31 जानेवारीला सकाळी धुके आणि अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील कमाल तापमान जास्त असल्याने तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत पुण्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
advertisement
छत्रपती संभाजी नगर मधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 31 जानेवारीला धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
नाशिकमध्ये 31 जानेवारीला सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील किमान तापमानात 2 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमधील नागरिकांना काहीशी थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
नागपूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूर मध्ये 31 जानेवारीला अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. पुढील काही दिवस नागपूरमध्ये ढगाळ आकाश कायम असणार आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने नागपूर करांना उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात 31 जानेवारीला पुन्हा बदल घडून आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नाशिकमधील किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईसह इतर शहरांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या सुरवातीस मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नाशिकमधील पारा घसरला, पुण्यात धुके, पाहा हवामान अपडेट
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement