Mumbai News: मुंबईतील 125 वर्षे जुना पूल पाडणार, 10 सप्टेंबरपासून वाहतूक बंद, मनसेचा इशारा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Prabhadevi Bridge: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत प्रभादेवी येथील ऐतिहासिक पूल तोडण्यात येणार असून त्याजागी नवा, आधुनिक आणि दुहेरी पूल उभारण्यात येणार आहे
मुंबई: मुंबईतील महत्त्वाच्या शिवडी-वरळी उन्नत मार्ग (अटल सेतू लिंक) प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील 125 वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक पूल अखेर पाडण्यात येणार आहे. हा पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत तोडण्यात येणार असून त्याजागी नवा, आधुनिक आणि दुहेरी पूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी 10 सप्टेंबरच्या रात्रीपासून हा पूल सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
एमएमआरडीए गेल्या काही महिन्यांपासून या पुलाच्या कामासाठी हालचाली करत आहे. मात्र स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असल्यामुळे हे काम अद्याप सुरू होऊ शकले नव्हते. आता गणेशोत्सवानंतर प्रत्यक्ष पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
प्रशासनाच्या या निर्णयाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. रहिवाशांचा आरोप आहे की, अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न लागता प्रशासन पूल पाडत आहे. हाजी बुरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ पटेल यांनी सांगितले की “पुनर्वसन न करता पूल पाडणे हा अन्याय आहे. आम्ही रस्त्यावर उतरू आणि पूल बंद होऊ देणार नाही.”
या वादात आता राजकीय पक्षही उतरले आहेत. मनसे वाहतूक सेनेने घोषणा केली आहे की मनसे तसेच शिवसेना (ठाकरे गट) यांचे कार्यकर्ते रहिवाशांसोबत आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यांनी प्रशासनाला योग्य पुनर्वसन योजना तयार न करता पूल पाडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
advertisement
दरम्यान, स्थानिक नागरिक, दुकानदार आणि वाहनचालक यांच्यातही या कामाबाबत चिंता आहे. पूल बंद झाल्यास वाहतुकीवर मोठा परिणाम होईल. तसेच पर्यायी मार्गांचीही माहिती दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2025 9:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईतील 125 वर्षे जुना पूल पाडणार, 10 सप्टेंबरपासून वाहतूक बंद, मनसेचा इशारा


