Mumbai Local Accident : 172 वर्षात मुंबई पहिल्यांदाच असं घडलं, 2 लोकलमधील प्रवाशांची एकमेकांना धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू

Last Updated:

Mumbai Local Accident : आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही प्रवासी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

File Photo
File Photo
ठाणे: ऐन गर्दीच्या वेळी धावत्या ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली आहे. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर रेल्वे रुळांवर रक्ताचा सडा दिसून आला. तर, काही मृत प्रवाशांचे मृतदेह प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आल्याने प्लॅटफॉर्मवरही रक्ताने माखले असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र दिसून आले.आज सकाळी 10 ते 12 प्रवासी ट्रेनमधून पडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दिवा स्थानकातही दोन प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही प्रवासी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रवासी पडले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवारचा दिवस आणि कामावर जाण्याची घाई यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळेच प्रवाशांचा घात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

या कारणाने घेतला गेला रेल्वे प्रवाशांचा बळी....

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातातील पीडित प्रवासी हे लोकलमधील प्रवासी आहेत. एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने जाणारी आणि एक कल्याण-कसाराच्या दिशेने जाणारी लोकल एकाच वेळी आल्या. त्यावेळी दिवा-मुंब्रामधील एका वळणावर दोन्ही लोकलमधील प्रवासी हे एकमेकांना धडकले आणि रेल्वे रुळावर पडले, असल्याची घटना घडली. मुंबई लोकल ट्रेनच्या इतिहासातील हा पहिलाच असा विचित्र अपघात असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त प्रवासी हे लोकलच्या दरवाजात उभे होते, अशी माहिती समोर आली आहे. लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करणे धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.
एका प्रत्यक्षदर्शीने न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवासी पडले.  त्यातील 8 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Accident : 172 वर्षात मुंबई पहिल्यांदाच असं घडलं, 2 लोकलमधील प्रवाशांची एकमेकांना धडक, 6 प्रवाशांचा मृत्यू
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement