Mumbai Local Train : ट्रेनमध्ये सीटवरून राडा, कसारा लोकलमधील प्रवाशांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल
- Reported by:PRADIP BHANGE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Local Train : लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या गटबाजीवरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
कल्याण: मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांचा राडा होणारी घटना समोर आली आहे. आज सकाळी कसाराहून धावणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये जागेवरुन वाद झाला. लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या गटबाजीवरून हा वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ हा सकाळी 6:10 वाजण्याच्या सुमारासच्या कसारा लोकलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. दररोज प्रवास करणाऱ्या एका चाकरमानी प्रवाशांच्या गटाने सार्वजनिक सीट्स "आरक्षित" असल्याचा दावा केला. या प्रवाशांनी इतर प्रवाशांना त्या रिकाम्या जागेवर बसण्यास रोखल्याने वादावादी झाली.
प्रत्य्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, एका प्रवाशाने खिडकीजवळील सीटवर बसून शेजारच्या दोन सीट्सवर आपली बॅग ठेवली आणि इतर प्रवाशांना बसण्यास मनाई केली. आमचा माणूस येणार आहे, या दोन्ही सीट आमच्या आहेत, तुम्हाला जे करायचं आहे करा, अशी अरेरावीच या व्यक्तीने केली. त्याच्या या दादागिरीमुळे अन्य प्रवाशी संतप्त झाले आणि त्यांनी त्याला जाब विचारला. काही प्रवाशांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकोर्ड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जागा अडवून धरणारा ग्रुप शांत बसला. त्यांनी इतर प्रवाशांना उत्तर देणं बंद केलं.
advertisement
या जागा अडवण्याच्या प्रकारामुळे लोकलमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. जागा असूनही अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागला. स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अशा गटांकडून नियमितपणे जागा अडवल्या जातात. त्यामुळे नवीन आणि इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
सध्या या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामान्य प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे. लोकलमधील गटबाजी, अडथळा, आणि दादागिरीला लगाम घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना व्हाव्यात, अन्यथा प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Aug 04, 2025 10:18 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Train : ट्रेनमध्ये सीटवरून राडा, कसारा लोकलमधील प्रवाशांच्या दादागिरीचा व्हिडीओ व्हायरल










