Mumbai Metro: मुंबईकरांचा वेळ वाचणार! मेट्रो 3 सुसाट सुटणार, आरे ते कफ परेड कधी सुरू होणार?

Last Updated:

Mumbai Metro: कफ परेडपासून ते थेट आरे वसाहतीपर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे. या संपूर्ण मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांचा वेळ वाचणार! मेट्रो 3 सुसाट सुटणार, आरे ते कफ परेड लवकरच धावणार
Mumbai Metro: मुंबईकरांचा वेळ वाचणार! मेट्रो 3 सुसाट सुटणार, आरे ते कफ परेड लवकरच धावणार
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 संपूर्ण मार्गिकेवरून लवकरच मेट्रो धावणार आहे. या मार्गिकेच्या शेवटच्या टप्प्याच्या तपासणीसाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पत्र लिहिले आहे. येत्या काही दिवसांत सीएमआरएस पथकाकडून या मेट्रो मार्गिकेच्या सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याच्या मार्गाची तपासणी होईल. त्यामुळे सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ‘मेट्रो 3'चा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.
मुंबईत एमएमआरसीमार्फत 33.5 किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर 27 स्थानके असून आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याचा 12.69 किमी लांबीचा मार्ग 7 ऑक्टोबर 2024 पासून खुला झाला. त्यानंतर 9 मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक या दुसऱ्या टप्प्याच्या 9.77 किमीच्या मार्गाचे लोकार्पण झाले. त्यातून मेट्रो 3 च्या आरे ते आचार्य अत्रे चौक दरम्यान 16 स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झाली आहे.
advertisement
शेवटचा टप्पा लवकर खुला होणार
वरळी नाका ते कफ परेडपर्यंतच्या उर्वरित 11.2 किमीच्या मार्गावर 11 स्थानके आहेत. आता शेवटच्या टप्प्यातील या मार्गावर सेवा सुरू केली जाणार आहे. अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासह अन्य एनओसी एमएमआरसीने मिळवल्या आहेत. त्यामुळे लवकरच आरे ते कफ परेड मेट्रो 3 धावणार असून 27 स्थानकांवर मुंबईकरांना सेवा मिळणार आहे.
advertisement
8 वर्षांचा कालावधी
दरम्यान, मेट्रो 3 मार्गिकेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. तब्बल आठ वर्षांहून अधिक काळानंतर या मेट्रोचा 33.5 किमीचा संपूर्ण मार्ग प्रवासी सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे कफ परेडपासून ते थेट आरे वसाहतीपर्यंत प्रवाशांना मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.
शेवटच्या टप्प्यात कोणती स्थानके?
कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम ही 11 स्थानके शेवटच्या टप्प्यात आहेत.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Metro: मुंबईकरांचा वेळ वाचणार! मेट्रो 3 सुसाट सुटणार, आरे ते कफ परेड कधी सुरू होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement