Railway Reservation: मोठी बातमी! रेल्वेची आरक्षण प्रणाली सहा तास बंद, का आणि कधी? तुमच्या कामाची माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Railway Reservation: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे आरक्षण प्रणाली आजपासून सहा तास बंद राहणार आहे.
मुंबई: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) आजपासून सहा तासांसाठी बंद राहणार आहे. ही प्रणाली आज, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11.45 पासून ते 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.45 वाजेपर्यंत बंद राहील. देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपासून पाच तास पीएनआर कॉम्प्रेशनसह स्थिर आणि गतिमान प्रणालीची देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रांवरील सर्व सेवा बंद राहणार आहे. यामध्ये प्रवासी आरक्षण, तिकीट रद्द करणे, रिफंड, करंट बुकिंग, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल यांचा समावेश आहे. आज रात्री 11.45 वाजेपासून ते सोमवारी पहाटे 5.45 पर्यंत आरक्षण प्रणाली बंद राहील.
advertisement
इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण नाही
दरम्यान, या काळात इंटरनेटद्वारेही तिकीट आरक्षण होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना या काळात अडचणी येऊ शकतात; त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तिकीट रद्द केल्यास विद्यमान नियमांनुसार टीडीआर जारी केला जाईल, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
रेल्वेने प्रवाशांना या आवश्यक कामासाठी सहकार्य करण्याचे आणि प्रवासाची योजना आखताना वेळेचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Reservation: मोठी बातमी! रेल्वेची आरक्षण प्रणाली सहा तास बंद, का आणि कधी? तुमच्या कामाची माहिती