BMC News : ठाकरे गटासोबत दरेकरांनाही पराभवाचा धक्का, बीएमसी कामगारांनी केला उलटफेर, कोणाच्या हाती सत्ता?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Bank Elections : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मोठा उलटफेर झाला आहे.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मोठा उलटफेर झाला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्याशिवाय ठाकरे गटालाही धक्का बसला आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिका कामगारांच्या पतसंस्थेची निवडणूक पार पडली.
advertisement
गेली दहा वर्षे वर्चस्व गाजवणाऱ्या प्रस्थापित जय सहकार पॅनलचा पराभव झाला असून, प्रथमच विष्णू भोईर आणि किरण आव्हाड यांच्या सहकार पॅनलने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. जय सहकार पॅनलच्या माध्यमातून भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीत एन्ट्री घेतली होती. मात्र, त्यांच्या पॅनलच्या बहुतांशीजणांना पराभव स्वीकारावा लागला. त्याशिवाय, प्रहारचे बच्चू कडू यांच्या पॅनलचाही पराभव झाला.
advertisement
गुरुवारी पार पडलेल्या या निवडणुकीत 60 हजार 134 सभासदांपैकी 29 हजार 119 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. वकील गुणवंत सदावर्ते यांनी माघार घेतल्याने या निवडणुकीत मुख्य लढत जय सहकार पॅनल (प्रस्थापित गट) आणि सहकार पॅनल यांच्यात झाली.
advertisement
निकालांमध्ये जय सहकार पॅनलचा जवळपास पूर्ण पराभव झाला असून, त्यांचे केवळ पाच उमेदवारच निवडून आले. उर्वरित सर्व जागा सहकार पॅनलच्या उमेदवारांनी जिंकल्या. या निकालामुळे प्रस्थापित गटाशी संलग्न प्रवीण दरेकर व ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपशी संलग्न असलेले विष्णू घुमरे यांच्यासह काही उमेदवार विजयी झाले असले तरी, ठाकरे गटाचे सिनेट सदस्य तसेच युवा सेनेचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागला.
advertisement
गेल्या दशकभर संचालक मंडळावर वर्चस्व राखणाऱ्या जय सहकार पॅनलचा पराभव हा मुंबई महापालिका कामगारांच्या पतसंस्थेतील मोठी घडामोड असल्याचे म्हटले जात आहे. या पतसंस्थेची उलाढाल ही जवळपास 5500 कोटींच्या घरातील आहे. बँकेच्या संचालक मंडळात 19 संचालक असतात. तर, मुंबई महापालिकेचे आयुक्त हे बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
advertisement
>> विजयी उमेदवारांची यादी
सर्वसाधारण
सहकार पॅनल
1)विवेक आठवले
2)किरण आव्हाड
3)अभिजीत बागुल
4) बोरीचा बिपीन
5) घारे सुरेश
6)जाधव विजय नाना
7) इंदल राठोड
8)महेश ठाकरे
9)बनसोडे नितीन
advertisement
10)कसबे कुणाल
जय सहकार पॅनल
11)विष्णू घुमरे
12)मुकेश घुमरे
13)दरेकर संतोष
14) दामोदरे रविंद्र
राखीव गट
OBC - भानुदास भोईर
NT - राजेंद्र कराडे
अनुसूचित जाती- गिरीष जाधव
महिला - लीना इंगळे, कविता विशे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 24, 2025 1:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
BMC News : ठाकरे गटासोबत दरेकरांनाही पराभवाचा धक्का, बीएमसी कामगारांनी केला उलटफेर, कोणाच्या हाती सत्ता?