मोठी बातमी! प्रवाशांनी भरलेली सफाळे–विरार बोट समुद्रात अडकली, 200 प्रवाशांचा जीव टांगणीला
- Published by:Prachi Amale
- Reported by:Vijay Desai
Last Updated:
रो-रो बोटीवर 200 हून अधिक प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त दुचाकी–चारचाकी वाहने आहेत.
पालघर : सफाळे–विरार दरम्यान धावणारी रो-रो सेवा रविवारी म्हारंबळपाडा जेटीजवळ समुद्रात अडकल्याने मोठा गोंधळ उडालाल. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहने घेऊन निघालेली ही बोट समुद्रात अडकली असून तब्बल दोन तासांपासून प्रवासी बोटीतच अडकले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रो-रो बोटीवर 200 हून अधिक प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त दुचाकी–चारचाकी वाहने होती. प्रवास सुरू असतानाच बोटीचा रॅम्प उचलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप अचानक तुटला. त्यामुळे बोट पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला आणि ती म्हारंबळपाडा जेटीजवळच समुद्रात थांबली. बोटीवरील प्रवाशांमध्ये सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दोन तासांहून अधिक वेळ प्रवासी बोटीतच
advertisement
सुटका होण्यासाठी अनेकांनी मदतीसाठी फोन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे बोटीची सुटका तातडीने होऊ शकली नाही. दोन तासांहून अधिक वेळ प्रवासी बोटीतच अडकले आहेत.
रो-रो सेवेसाठी नेहमीपेक्षा जास्त प्रवासी आणि वाहने घेतली गेल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
बोटीवरील प्रवाशांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. बोटीवरील प्रवाशांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचाही विचार सुरू आहे. या घटनेमुळे रो-रो सेवेसंदर्भातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवाशांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी काटेकोर सुरक्षा तपासणीनंतरच सेवा सुरु करावी, अशी मागणी होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 8:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! प्रवाशांनी भरलेली सफाळे–विरार बोट समुद्रात अडकली, 200 प्रवाशांचा जीव टांगणीला