दिवाळीमध्ये करा नव्या बिझनेसचा श्रीगणेशा, 100 रूपयापासून सुरू करा 'हा' बिझनेस
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
दिवाळी म्हटलं की घर सजावट, रांगोळी, फुलं आणि रंगीबेरंगी तोरण यांची खरेदी सुरूच असते. पण जर हे सगळं सजावटीचं साहित्य आपण घरच्या घरी स्वतः तयार करू शकलो, तर?
मुंबई: दिवाळी म्हटलं की घर सजावट, रांगोळी, फुलं आणि रंगीबेरंगी तोरण यांची खरेदी सुरूच असते. पण जर हे सगळं सजावटीचं साहित्य आपण घरच्या घरी स्वतः तयार करू शकलो, तर?
होय! केवळ ₹100 रुपयांच्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकरीपासून आकर्षक तोरण, हार आणि गजरे विणून घर सजवू शकता आणि त्याचसोबत छोटासा व्यवसायही सुरू करू शकता.
लोकरीपासून तोरण, थालपोष तसंच छोटे छोटे गाजरे आणि वेण्या कशा कराव्या याबद्दलच अनन्या राघव यांनी सोप्पी पद्धत सांगितली आहे. दिवाळी साठी खास गजरा कसा विनावा याची सोपी पद्धत त्यांनी लोकल 18 सोबत संवाद साधताना सांगितली आहे.
advertisement
यासाठी लागणारे साहित्य अगदी साधे आहे, तीन रंगांच्या लोकरीचे गोळे, एक कैची , आणि लोकरी विणकामाची सुई
विणकामाची पद्धत: सर्वप्रथम पांढऱ्या रंगाचा धागा घ्या. हा धागा गजराचा पाया म्हणून वापरायचा आहे. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये हिरवा रंगाचा धागा घ्या — हा धागा गजराला आधार देण्यासाठी आणि आकार राखण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर तुम्हाला ज्या रंगाचं फूल तयार करायचं आहे, त्या रंगाचा तिसरा धागा निवडा . उदाहरणार्थ पिवळा धागा वापरल्यास सूर्यफुलासारखं फूल तयार होतं, लाल धागा वापरल्यास पारंपरिक गजऱ्याचा लूक मिळतो आणि पांढरा धागा वापरल्यास मोत्यासारखी सुंदर झाक दिसते.हा गजरा केसात माळण्यासाठी, तोरणासाठी किंवा घराच्या सजावटीसाठी वापरता येतो. सणासुदीच्या काळात याची बाजारात चांगली मागणी असते, त्यामुळे हा छोटासा व्यवसाय मोठ्या कमाईचं साधन ठरू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 9:24 PM IST