Yashashree Shinde : दाऊदनं यशश्रीला इतक्या क्रूरपणे का संपवलं? हत्येपूर्वीचा exclusive video समोर

Last Updated:

तीन दिवसांपूर्वी उरणमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. आता याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

News18
News18
नवी मुंबई, प्रमोद पाटील, प्रतिनिधी : तीन दिवसांपूर्वी उरणमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनं महाराष्ट्र हादरला. यशश्री गुरुवारपासून बेपत्ता होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर आढळून आला. यशश्रीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं यशश्रीची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे यशश्रीची हत्या होण्यापूर्वी कही वेळेआधीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा व्हिडीओ 25 जुलैरोजी दुपारी 2 वाजून 14 मिनिटं आणि 35 सेकंदाचा आहे. ज्यामध्ये यशश्री हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ हा आरोपी दाऊद शेखचा आहे. हा व्हिडीओ दुपारी 2 वाजून 22 मिनिटांचा आहे. दहा मिनिटांनंतर त्याने यशश्रीचा पाठलाग सुरू केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
advertisement
दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात 
दरम्यान दाऊद शेख याला आज कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्नाटकच्या शाहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जात आहे. दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Yashashree Shinde : दाऊदनं यशश्रीला इतक्या क्रूरपणे का संपवलं? हत्येपूर्वीचा exclusive video समोर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement