बिलाच्या वादावरून तरुणाचे टोकाचे पाऊल, थेट रूग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी; डोंबिवलीतील घटना
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मंगळवारी सायंकाळी रोहित याने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
डोंबिवली : डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तरुणाचे नाव रोहित कटके असे आहे. या घटनेतून तरुण बचावला असला तरी त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बिलाच्या वादातून तरुणाने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र यावर कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
रुग्णालयात रोहित याची आई मंदा कटके हिच्यावर उपचार सुरु आहे. दीड वर्षापासून मंदा कटके यांना कर्करोग झाला आहे. त्यांना उपचारासाठी बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी रोहित याने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.रोहीत जेव्हा रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर पोहचला होता. त्यावेळी त्याला वाचविण्याकरीता अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले होते. अग्नी शमन दलाची गाडी रोहीतला वाचविण्याकरीता आली तेव्हा अग्नीशमन दलाच्या जवानांनी योग्य ते प्रयत्न केले नाही. केवळ बघ्याची भूमिका घेतली असा आरोप जागरुक नागरीक मिलिंद दिवाडकरर यांनी केला आहे.
advertisement
तर अग्नीशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, त्यांच्याकडे जंपिंग शीट होती. ती त्याने लावण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वीच त्याने उडी मारली होती, त्यांच्याकडे नेट नव्हते. हे अग्नीशमन दलाच्या जवानांनी मान्य केले, मात्र यावर अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली नाही...
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 07, 2025 9:47 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
बिलाच्या वादावरून तरुणाचे टोकाचे पाऊल, थेट रूग्णालयाच्या इमारतीवरून मारली उडी; डोंबिवलीतील घटना