मारेकरी राजाला मारणार नव्हते, सोनमने ऐनवेळी चालवलं डोकं, पुढच्याच क्षणात पडला मर्डर, हत्येच्या आधी काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Indore Couple Missing Case: प्लॅन करून राजा रघुवंशीला मारायला आलेल्या मारेकऱ्यांनी ऐनवेळी त्याला मारायला नकार दिला होता. पण सोनमने ऐनवेळी डोकं चालवलं आणि राजाची हत्या घडवून आणली. त्यावेळी नेमकं काय घडलं याचा खुलासा स्वत: आरोपीनं केला आहे.
Indore Couple Missing Case: मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशीला अटक केल्यानंतर या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहेत. सोनमनेच आपला प्रियकर राज कुशवाह याला हाताशी धरून राजाची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. राजने आपल्या तीन मित्रांना सुपारी देऊन हे हत्याकांड घडवल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तिचा प्रियकर राज आणि इतर तीन जणांना अटक केली आहे.
या पाचही जणांची चौकशी केली असता घटनेच्या दिवशी २३ मे ला राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? याची सविस्तर माहिती समोर आली आहे. तसेच हत्येच्या काही मिनिटं आधी आरोपींनी राजाची हत्या करायला नकार दिला होता. आपण हत्या करणार नाही, असं त्यांनी सोनमला सांगितलं होतं. मात्र सोनमने ऐनवेळी डोकं चालवलं. ज्यामुळे मारेकरी राजाला मारायला तयार झाले?
advertisement
हत्येच्या आधी काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच राजाची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी आपल्या शाळकरी मित्रांसोबत एका कॅफेत बैठक घेतली आणि इथेच राजाच्या हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं. यासाठी आरोपी प्रियकर राजने आपले मित्र आकाश राजपूत, आनंद कुर्मी आणि विशाल चौहाण यांना कटात सामील करून घेतलं. यानंतर आकाश, आनंद आणि विशालने मिळून राजाची हत्या केली.
advertisement
घटनेच्या दिवशी २३ मेला सोनम फोटो शूट करण्याच्या बहाण्याने राजाला घेऊन कोरसा परिसरात घेऊन गेली. हा सगळा डोंगराळ भाग असून या परिसरात लोकांची वर्दळ अत्यंत कमी असते. याठिकाणी जात असताना तिन्ही आरोपी हिंदीतून गप्पा मारत दोघांमध्ये मिसळले. मेघालयात हिंदी बोलणारे पर्यटक मिळाल्याने राजाही त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंग झाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर सोनमने थकली असल्याचा बहाणा केला आणि ती पाठिमागे चालू लागली. तर तिन्ही आरोपी आणि राजा गप्पा मारत काही अंतर पुढे गेले.
advertisement
ऐनवेळी आरोपींची माघार पण सोनमने चालवलं डोकं
काही वेळ डोंगर चढल्यानंतर मारेकऱ्यांनी सोनमशी संवाद साधला आणि आपण राजाची हत्या करणार नाही, असं सांगितलं. मारेकऱ्यांनी ऐनवेळी हत्या करण्यास नकार दिल्याने सोनम बिथरली. पण पुढच्याच क्षणी तिने डोकं चालवलं आणि मारेकऱ्यांना २० लाख रुपये देते अशी ऑफर दिली. सोनम एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने राजाच्या पॉकेटमधून १५ हजार रुपये काढले आणि आरोपीला दिले. पैसे बघून आरोपींचं पुन्हा मतपरिवर्तन झालं आणि ते राजाची हत्या करायला राजी झाले. काही अंतर दूर गेल्यानंतर तिघांनी मिळून राजाची हत्या केली.
advertisement
सोनमने सिग्नल देताच राजावर झाले वार
तत्पूर्वी सोनमने राजाची हत्या करण्याचा सिग्नल दिला. निर्जनस्थळी कुणी नसल्याचं पाहून सोनमने ओरडून 'याला मारून टाका' अशी हाक दिली. सोनमने सिग्नल देताच राजासोबत गप्पा मारणाऱ्या आनंद, आकाश आणि विशालनं सोबत आणलेली हत्यारं काढली. तिन्ही जणांनी विशालच्या डोक्यात वार केले. काही कळायच्या आत हल्ला झाल्याने राजा स्वत:चा बचाव करू शकला नाही. घाव वर्मी लागल्याने राजा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर आरोपींनी राजाचा मृतदेह जवळच्या दरीत फेकून घटनास्थळावरून पळ काढला.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 10, 2025 9:51 AM IST
मराठी बातम्या/देश/
मारेकरी राजाला मारणार नव्हते, सोनमने ऐनवेळी चालवलं डोकं, पुढच्याच क्षणात पडला मर्डर, हत्येच्या आधी काय घडलं?