Kanpur Blast : कानपूरमधील स्फोटाने देश हादरला, रस्त्यावरील 2 स्कूटरमध्ये धमाका, 8 जण गंभीर जखमी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा कानपूरमधील मेस्टन रोडवर एक शक्तिशाली स्फोट झाला आहे.
कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा कानपूरमधील मेस्टन रोडवर एक शक्तिशाली स्फोट झाला आहे. यात चार ते पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूटरवर हा स्फोट झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला बेकायदेशीरपणे फटाके साठवण्यासाठी हा परिसर ओळखला जातो. पण, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#WATCH | Kanpur, Uttar Pradesh: Joint Police Commissioner (Law and Order) Ashutosh Kumar says, "In the Mishri Bazaar area under the Mulganj police station, two scooters were parked today in which a blast occurred. This incident took place around 7:15 PM... A total of 6 people are… pic.twitter.com/ES52kcWBxK
— ANI (@ANI) October 8, 2025
advertisement
उर्सुला रुग्णालयात जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस आयुक्त रघुवीर लाल यांनी सांगितले की, सध्या सणांचा मोसम आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथके तसंच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. कृपया अफवांकडे लक्ष देऊ नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
advertisement
मशिदीच्या भिंतींना भेगा
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे जवळच्या मरकझ मशिदीच्या भिंतींनाही तडे गेले. हा स्फोट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कुटीमध्ये झाला आहे. पोलिसांनी या स्कुटी मालकाची ओळख पटवली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आवाज सुमारे 500 मीटर अंतरावर ऐकू गेला. आवाजाने आसपासचे नागरिक घाबरले आणि घटनास्थळी गोंधळ उडाला.
Location :
Kanpur Nagar,Uttar Pradesh
First Published :
October 08, 2025 9:27 PM IST
मराठी बातम्या/देश/
Kanpur Blast : कानपूरमधील स्फोटाने देश हादरला, रस्त्यावरील 2 स्कूटरमध्ये धमाका, 8 जण गंभीर जखमी