विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरींच्या वादाची चर्चा; पण लोकांना मोटिव्हेट करून कोण किती कमवतं? जाणून घ्या

Last Updated:

विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी दोघंही एकाच फिल्डमधले, एकाच वयाचे आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांच्यात श्रीमंत कोण?
विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांच्यात श्रीमंत कोण?
नवी दिल्ली, 28 डिसेंबर : प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा सध्या पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापूर्वी तो प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांच्यासोबत झालेल्या वादामुळे चर्चेत राहिला होता. विवेकवर पत्नीने केलेल्या आरोपांनंतर त्याच्या व संदीप माहेश्वरीच्या वादाची पुन्हा चर्चा रंगली आहे. हे दोघेही मोटिव्हेशनल स्पीकर आहेत आणि लोकांना चांगल्या-वाईटातला फरक सांगून प्रोत्साहन देणारी भाषणं करतात; पण सध्या ते एका व्हिडिओवरून आपसात भांडत आहेत.
मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी नुकताच 'बिग स्कॅम एक्स्पोज्ड' नावाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विवेक बिंद्रावर मल्टी लेव्हल मार्केटिंग नावावर कोर्स चालवल्याचा आणि बिझनेस शिकविण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतल्याचा आरोप केला आहे. या घोटाळ्याची रक्कम सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं संदीप यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओनंतर विवेक बिंद्राने संदीप माहेश्वरी यांना व्हिडिओद्वारे आव्हान दिलं आहे. वाद इतका वाढलाय, की हे प्रकरण कोर्टात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे या वादात अडकलेले दोघेही एकाच फिल्डमधले, एकाच वयाचे आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.
advertisement
विवेक बिंद्रा हा देशातला प्रसिद्ध इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर आहे. विवेकचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने इतरांना प्रेरित करून चांगली कमाई केली. त्याची प्रेरणादायी भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होतात. विवेक बिंद्राच्या @MrVivekBindra या YouTube चॅनेलवर 21.4 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. तो यू-ट्यूबमधून चांगली कमाई करतो. याशिवाय तो बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. त्यांची कंपनी लोकांना प्रोफेशनल ट्रेनिंग देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेक बिंद्राची एकूण संपत्ती 11 मिलियन रुपये म्हणजेच 90 कोटी रुपये आहे. दर महिन्याला तो 40 ते 50 लाख रुपये कमावतो. त्याची वार्षिक कमाई 7 ते 9 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे दिल्ली, नोएडा, मुंबईमध्ये अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.
advertisement
संदीप माहेश्वरी यांनी कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं; पण ते कमाईत अनेक बिझनेसमन्सना मागे टाकतात. संदीप यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर फोटोग्राफीमध्ये हात आजमावला. त्यांनी 2002मध्ये मॉडेलिंग आधारित कंपनी सुरू केली. परंतु हवं तितकं यश मिळालं नाही. 2006मध्ये त्यांनी इमेजेस बाझारची सुरुवात केली. हे भारतीय फोटोंचं सर्वांत मोठं हब आहे. त्यानंतर त्यांनी यू-ट्यूबवर एंट्री केली आणि मोटिव्हेशनल भाषणं देण्यास सुरुवात केली. त्यांच्या चॅनेलवर त्याचे 3 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास त्याची एकूण संपत्ती 4 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 33 कोटी रुपये आहे. याशिवाय दिल्लीत त्यांचं 17 कोटींचं घर आहे. संदीप दरमहा 30 ते 40 लाख रुपये कमावतात. त्यांची वार्षिक कमाई 3 ते 4 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/देश/
विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरींच्या वादाची चर्चा; पण लोकांना मोटिव्हेट करून कोण किती कमवतं? जाणून घ्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement