Lok Sabha Election Result 2024 : नीतीश कुमार यांना उप-पंतप्रधानपदाची ऑफर? कुणी आणि कधी दिली?

Last Updated:

Lok Sabha Election Result 2024 Nitish kumar Stand : भाजपच्या ज्या जागा जिंकून येतील असं वाटत होतं तिथेच जादूची काडी फिरल्यासारखे निकाल उलटे फिरले आहेत. त्यामुळे एनडीएचं टेन्शन वाढलं आहे.

नीतीश कुमार
नीतीश कुमार
नवी दिल्ली : भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळवता मिळवता संपूर्ण देशभरात 400 पार आकडा पार करताना आता नाही नऊ आल्या आहेत. इंडिया आघाडीने एनडीएच्या नाकी दम आणला आहे. दोघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपच्या ज्या जागा जिंकून येतील असं वाटत होतं तिथेच जादूची काडी फिरल्यासारखे निकाल उलटे फिरले आहेत. त्यामुळे एनडीएचं टेन्शन वाढलं आहे.
एनडीए 300 पार तरी जाणार का अशी साशंकता असताना आता चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांना सोबत घेऊन जाण्यासाठी भाजप आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) प्रमुख नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधला आहे.
नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका एसपीने ट्विटरवर याबद्दल पोस्ट करुन माहिती दिली. नीतीश कुमार इंडिया आघाडीसोबत पुन्हा येतील. एनडीए 300 जागांचा टप्पा ओलांडण्यासाठी धडपडत असताना सपा नेत्याच्या ट्विटने चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
समाजवादी पक्षाचे आय.पी सिंह यांनी ट्वीट करत म्हणाले, 'नितीश आमचे होते, आमचे आहेत आणि आमचेच राहतील. जय सीता राम.' अशीही बातमी आहे की, शरद पवारांनी नितीश कुमार यांना फोन करून बोलले आहे.
मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाल्याचा स्पष्ट नकारालं आहे. भाजपला एकट्याने बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापनेची कसरत सुरू झाल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांनी नितीशकुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली असून आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन चंद्राबाबू नायडू यांना दिल्याचे यापूर्वी सांगण्यात आलं होतं.
advertisement
या सगळ्यात नेमकं पारडं कुणाचं जड होतं आणि नीतीश कुमार एनडीएसोबत राहतात की आपलं मत बदलतात ते पुढच्या अजून काही तासांच चित्र स्पष्ट होईल, सध्या तरी नीतीश कुमार यांनी एनडीएसोबत राहणार असल्याची भूमिका घेतली आहे, असं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र कुजबुज कायम आहे.
मराठी बातम्या/देश/
Lok Sabha Election Result 2024 : नीतीश कुमार यांना उप-पंतप्रधानपदाची ऑफर? कुणी आणि कधी दिली?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement