राजा रघुवंशीचा मर्डर करणाऱ्यांना चोप,राजला थोबाडीत लगावली; इंदूर एअरपोर्टवर तणाव

Last Updated:

Raja Raghuvanshi Murder: इंदूर विमानतळावर राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपींना प्रवाशांनी मारहाण केली. शिलाँग पोलिसांनी आरोपींना ट्रांझिट रिमांडवर घेतले होते.

News18
News18
इंदूर: राजा रघुवंशी हत्याकांडात अडकलेल्या आरोपींना आज इंदूर विमानतळावर प्रवाशांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिलाँग पोलिसांकडून ट्रांझिट रिमांडवर घेऊन जात असताना संतप्त प्रवाशांनी आरोपींना मारहाण केल्याची घटना घडली.
मेघालय पोलीस राजा रघुवंशी हत्याकांडात अटक केलेल्या चार प्रमुख आरोपींना ज्यात सोनम, राज, आनंद, आकाश आणि विशाल उर्फ विक्की यांचा समावेश आहे. त्यांना घेऊन इंदूर विमानतळावर पोहोचले होते. यावेळी विमानतळावर उपस्थित काही प्रवाशांनी आरोपींना पाहताच संताप व्यक्त केला. याचवेळी एका प्रवाशाने मुख्य आरोपी राजला थेट थप्पड मारली.
या घटनेमुळे विमानतळावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिलाँग पोलीस मोठ्या बंदोबस्तात या सर्व आरोपींना घेऊन आले होते. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना समोर पाहिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.
advertisement
सोनम, राज, आनंद, आकाश आणि विशाल उर्फ विक्की या सर्व आरोपींची आता शिलाँग पोलीस कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेघालय पोलिसांना आता या आरोपींना शिलाँगला नेऊन अधिक सखोल तपास करायचा आहे.
मराठी बातम्या/देश/
राजा रघुवंशीचा मर्डर करणाऱ्यांना चोप,राजला थोबाडीत लगावली; इंदूर एअरपोर्टवर तणाव
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement