Indore Couple Missing : सोनम बेवफा! शिलाँगमध्ये राजाची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक, 17 दिवसानंतर पहिला फोटो समोर
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sonam Raghuvanshi surrender in UP : हनिमूनला नवऱ्याचा काटा काढणाऱ्या सोनमने अखेर सरेंडर केलंय. त्यानंतर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या हनिमून हत्याकांडाची उकल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केलं आहे.
Indore Couple Missing Case : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदोरच्या कपल मिसिंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मेघालयातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्येप्रकरणी त्याच्या पत्नीला म्हणजेच सोनम रघुवंशीला अटक करण्यात आल्याचे डीजीपी आय नोंगरांग यांनी सांगितलं आहे. मेघालयातील या हनिमून हत्याकांडात पत्नीचाही सहभाग असल्याचे त्यांनी सांगितलं. तिने मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
सोनमचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग म्हणाले की, राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने यूपीतील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. रात्री उशिरा झालेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली. यूपीमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तर इतर दोन आरोपींना एसआयटीने इंदूरमधून पकडले आहे, असंही आय नोंगरांग डीजीपी म्हणाले आहेत.
advertisement
Ghazipur police arrests Sonam Raghuvanshi in joint operation with Meghalaya police. Sonam hired 4 assassins to murder her husband Raja Raghuvanshi on their honeymoon in Shillong. Congress tried to do politics in the case by demanding CBI probe. pic.twitter.com/8WlW3fyXAf
— Ankit Jain (@indiantweeter) June 9, 2025
advertisement
मेघालयचे मुख्यमंत्री म्हणतात...
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या हनिमून हत्याकांडाची उकल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आहे की, 'राजा हत्याकांडात मेघालय पोलिसांना 7 दिवसांत मोठे यश मिळाले आहे. मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्याची कारवाई अजूनही सुरू आहे.'
advertisement
सोनमच्या आईची प्रतिक्रिया
दरम्यान, सोनम सापडली याबद्दल आम्ही आभारी आहोत, पण वेदना अजूनही कायम आहेत. आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की राजाच्या हत्येमागे कोण होतं? ती परत आली आहे, पण तरीही दुःख आहे, आम्ही राजाला गमावलं, असं सोनम रघुवंशीची आई संगीता यांनी म्हटलं आहे.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 09, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing : सोनम बेवफा! शिलाँगमध्ये राजाची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक, 17 दिवसानंतर पहिला फोटो समोर