advertisement

भारताचे फायटर जेट सुखोई Su-30MKI रडारावरून गायब, पायलट बेपत्ता; विशेष पथक रात्रीच जंगलात सर्च ऑपरेशन

Last Updated:

Sukhoi Su-30MKI fighter jet: आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी भारतीय वायुसेनेचे सुखोई Su-30MKI लढाऊ विमान रडारावरून गायब झाले आहे.

News18
News18
नवी दिल्ली: आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील चोकीहोला परिसरातून गुरुवारी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30MKI लढाऊ विमान गायब झाल्याची माहिती नरेंगी येथील संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) दिली आहे.
विमानातील एक फायटर पायलट बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि पायलटचा शोध घेण्यासाठी संरक्षण दलाचे शोध पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, या विमानाशी शेवटचा संपर्क सायंकाळी 7.42 वाजता झाला होता. त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला असून ते नियोजित वेळेत परत न आल्यामुळे ते “ओव्हरड्यू” म्हणून नोंदवण्यात आले आहे.
advertisement
“भारतीय वायुसेनेचे एक Su-30 MKI विमान ओव्हरड्यू झाले आहे. हे विमान आसाममधील जोरहाट येथून उड्डाण केले होते आणि सायंकाळी 7.42 वाजता शेवटचा संपर्क झाला. पुढील तपशील मिळवण्याचे काम सुरू असून शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे,” असे हवाई दलाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
भारताचे फायटर जेट सुखोई Su-30MKI रडारावरून गायब, पायलट बेपत्ता; विशेष पथक रात्रीच जंगलात सर्च ऑपरेशन
Next Article
advertisement
How to Get Loan: सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या तुमचं Loan; फक्त एक काम करा
सॅलरी स्लिपशिवाय पाहिजे तेवढं कर्ज मिळेल; बँकेकडून झटक्यात मंजूर करून घ्या Loan
  • कर्ज घेण्यापूर्वी नक्की वाचा

  • बँक देणार तुम्हाला हवं तेवढं कर्ज

  • 'हे' छुपे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

View All
advertisement