हृदयद्रावक! खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला, भयंकर अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Tragic Incident: संतोष नगर कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये अडकून एका वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हैदराबाद: संतोष नगर कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये अडकून एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अपघातात जीव गमावणाऱ्या चिमुकल्याचे नाव सुरेंद्र असून, त्याचे वडील एका वसतिगृहात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ही घटना असिफनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
कसा घडला अपघात?
सुरेंद्र आपल्या घराजवळील मुसतफा अपार्टमेंटमध्ये राहत होता. खेळता खेळता तो लिफ्टमध्ये अडकला आणि या भयंकर अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, लहानग्याचा जीव वाचवता आला नाही.
अनेक अपघात लिफ्टशी संबंधित
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, याआधीही अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. लिफ्टमध्ये अडकणे किंवा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून मृत्यू होण्याचे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
advertisement
याआधीही अशाच घटना घडल्या!
अलीकडेच सीरिसिल्ला शहरातील एका अपार्टमेंटमध्ये ज्येष्ठ पोलीस अधिकारी ठोटा गंगाराम (५९) यांचा लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडून मृत्यू झाला होता. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्रिलचे दरवाजे उघडले, पण लिफ्ट आली नसल्याचे त्यांना समजले नाही. त्यांनी पुढे पाऊल टाकताच ते थेट शाफ्टमध्ये कोसळले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
फेब्रुवारीमधील हृदयद्रावक घटना
फेब्रुवारी महिन्यात देखील अशाच प्रकारची एक घटना घडली होती. एका सहा वर्षीय मुलाचा अपघात लिफ्ट आणि भिंतीच्या मधल्या जागेत अडकल्यामुळे झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
लिफ्ट सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लिफ्टच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहेत. त्यामुळे लिफ्टच्या देखभालीबाबत अधिक जबाबदारी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 13, 2025 2:38 PM IST
मराठी बातम्या/देश/
हृदयद्रावक! खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला, भयंकर अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू