Ahmedabad Air India Plane Crash: अपघातापूर्वी भाजपच्या मोठ्या नेत्याचा विमानातला फोटो आला समोर

Last Updated:

या विमानात भाजपचे नेते आणि गुजरातचे माजी विजय रुपानी सुद्धा प्रवास करत होते. विजय रुपानी यांचा विमानातला शेवटचा फोटो समोर आला आहे.

News18
News18
अहमदाबाद :  अहमदाबादमध्ये आज एअर इंडियाच्या विमानाला भीषण असा अपघात झाला. या विमानामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. पण अवघ्या १० मिनिटामध्ये हे विमान क्रॅश झालं. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या विमानात भाजपचे नेते आणि गुजरातचे माजी विजय रुपानी सुद्धा प्रवास करत होते. विजय रुपानी यांचा विमानातला शेवटचा फोटो समोर आला आहे.
गुजरातसाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचं AI-171 विमान लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये क्रॅश झालं. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाची यादी समोर आली आहे. प्रवाशांच्या यादीत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी प्रवास करत होते.  विजय रुपानी यांची पत्नी ही लंडनला वास्तव्यास आहे. त्यांना भेटण्यासाठी रुपानी हे लंडनला अहमदाबाद विमानतळावरून निघाले होते.
advertisement
विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी 7 ऑगस्ट 2016 ते 11 सप्टेंबर 2021 या काळात गुजरातचे 16 वे मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पाहिला होता.
विजय रुपानी यांची राजकीय कारकीर्द
त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्यकर्ते म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित आहेत.
advertisement
आणीबाणीच्या काळात (1975-77) त्यांनी विरोध केला होता आणि त्यांना 11 महिने तुरुंगातही राहावे लागले होते.
1987 मध्ये ते राजकोट महानगरपालिकेवर निवडून आले.
1996 ते 1997 या काळात त्यांनी राजकोटचे महापौर म्हणून काम केले.
ते 2006 ते 2012 पर्यंत राज्यसभा सदस्य होते.
2014 मध्ये ते राजकोट पश्चिम मतदारसंघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले.
advertisement
आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात ते वाहतूक, जलपुरवठा, कामगार आणि रोजगार मंत्री होते.
फेब्रुवारी 2016 ते ऑगस्ट 2016 पर्यंत ते भाजपच्या गुजरात प्रदेशाचे अध्यक्ष होते.
7 ऑगस्ट 2016 रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि 11 सप्टेंबर 2021 पर्यंत या पदावर होते.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Ahmedabad Air India Plane Crash: अपघातापूर्वी भाजपच्या मोठ्या नेत्याचा विमानातला फोटो आला समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement