श्रीनगरमध्ये 20 मिनिटांत 50 हून अधिक स्फोट, कारगिल अंधारात; पाकिस्तानकडून दल लेक, लाल चौक निशाण्यावर

Last Updated:

भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर पाकने पुन्हा गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केले. श्रीनगरमध्ये गोळीबार, स्फोटांनी भीतीचे वातावरण आहे. कारगिलमध्ये ब्लॅकआउट झाला आहे.

News18
News18
श्रीनगर/कारगिल (जम्मू-काश्मीर): भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर फक्त काही तासात पाकने पु्न्हा एकदा गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू केला आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये आज सायंकाळपासून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून श्रीनगर शहरात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि साखळी स्फोटांनी प्रचंड भीतीचे वातावरणआहे. तर दुसरीकडे कारगिल परिसरात पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आला आहे. श्रीनगरमधील दल लेक, हरी पर्वत आणि लाल चौक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीनगर शहरात गेल्या काही वेळापासून प्रचंड गोळीबार सुरू आहे. शहराच्या आकाशात सतत ड्रोन घिरट्या घालत असल्याचेही नागरिकांनी पाहिले आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिस्थितीची गंभीरता अधिक वाढवणारी बाब म्हणजे केवळ २० मिनिटांच्या कालावधीत ५० हून अधिक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. शहरात एकूण ८० स्फोट झाल्याचे समोर आले आहे. हे स्फोट नेमके कशामुळे झाले आणि यामध्ये किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
शस्त्रसंधीनंतर फक्त 30 मिनिटांनी पाकिस्तानला बसला पहिला शॉक; काहीच वाकडं...
श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील आणि प्रसिद्ध स्थळे जसे की दल सरोवर, ऐतिहासिक हरी पर्वत किल्ला आणि शहराचे हृदयस्थान असलेला लाल चौक हे हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. या वृत्तामुळे संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर लडाख क्षेत्रातील कारगिलमध्येही वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. हा वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला याचाही तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.
advertisement
या दोन्ही घटनांमुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये प्रचंड तणावाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाण्याची शक्यता आहे. या घटनांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
श्रीनगरमध्ये 20 मिनिटांत 50 हून अधिक स्फोट, कारगिल अंधारात; पाकिस्तानकडून दल लेक, लाल चौक निशाण्यावर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement