कोयना 86 टीएमसी भरले, नदीपात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा!

Last Updated:

पाटण (सातारा) येथील कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे, तरी धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर म्हणजेच 86.04 टीएमसी इतका झाला आहे. सध्या धरणात...

Koyna Dam water level
Koyna Dam water level
पाटण (सातारा) : कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर सध्या काहीसा कमी झाला असला, तरी धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. सध्या धरणात सरासरी 25009 क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणातील एकूण पाणीसाठा 86.04 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) इतका झाला आहे.
सध्याची पाण्याची आवक आणि पुढील काळात अपेक्षित पाऊस लक्षात घेऊन, कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे चार फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून विनावापर प्रतिसेकंद 19724 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. अशाप्रकारे एकून 21824 क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
advertisement
नदीकाठी सावधानतेचा इशारा
धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी आणि पूर्वेकडील विभागात पडणाऱ्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांना आणि लोकवस्त्यांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही संभाव्य धोक्यापासून बचाव करता येईल.
पावसाची सद्यस्थिती 
कोयना धरण शिवसागर जलाशयाच्या परिसरात, म्हणजेच कोयना, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही विभागात सध्या कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. तरीही, या पावसामुळे धरणांतर्गत असलेल्या छोट्या नद्या, नाले, ओढे आणि धबधब्यांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणाच्या दरवाजातून चार फुटांनी प्रतिसेकंद 19724 क्युसेक आणि पायथा वीज गृहातील वीस मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे चाळीस मेगावॅट वीजनिर्मिती करून 2100 क्यूसेक नदीत सोडले जात आहे.
advertisement
धरणाची साठवण क्षमता
मंगळवारी संध्याकाळी पाच ते बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धरणाच्या पाणीसाठी 2.16 टीएमसीने वाढ झालेली आहे. या धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठी 81.04 टीएमसी आहे. 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात अजून 19.21 टीएमसी पाण्याची गरज आहे, तेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
कोयना 86 टीएमसी भरले, नदीपात्रात पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement