Kalyan News : धक्कादायक!इडली सांबारमध्ये निघाली अळी, ग्राहकाने तक्रार करताच दुकानदारानेच उचललं टोकाचं पाऊल
Last Updated:
Kalyan Crime News : कल्याण पश्चिमेतील डोसा सेंटरमध्ये सांबरमध्ये अळी आढळली. ग्राहकाने तक्रार केल्यावर दुकानदाराने संताप व्यक्त करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस आणि महापालिकेने तातडीने हस्तक्षेप केला आहे.
कल्याण : कल्याण पश्चिमेतील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्याच येथे घडलेली एक घटना नागरिकांना धक्कादायक ठरली आहे. कर्णिक रोडवरील बालाजी डोसा सेंटरमध्ये खरेदी केलेल्या इडली सांबारमध्ये जिवंत अळी आढळल्याने ग्राहक संतप्त झाला. परंतु, या तक्रारीवर दुकानदारांनी माफी मागण्याऐवजी धमकी देण्याची घटना घडली. यानंतर पालिकेने दुकानदाराच्या दुकानातील सर्व खाद्यसाहित्य जप्त केले तर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.
नेमके घडले तरी काय?
तक्रारदार प्रथमेश गोरख शिंदे यांनी १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे २ वाजता बालाजी डोसा सेंटरमधून एक वडा-सांबर प्लेट आणि एक इडली प्लेट खरेदी केली. पार्सल घर घेऊन जाताना कुटुंबीयांसाठी दिलेल्या इडलीत त्यांनी जिवंत अळी असल्याचे पाहिले. ही दृश्य पाहून प्रथमेश अत्यंत संतप्त झाले आणि तातडीने दुकानदार लिंगराज लिगे गौडा यांच्याकडे गेले. त्यांनी याबाबत सूचित केले.मात्र, दुकानदारांनी या तक्रतीला दुर्लक्ष करून आक्षेपार्ह वर्तन केले.
advertisement
तक्रारदारांनी महानगरपालिकेकडे नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी म्हणून तक्रार नोंदवली. यानुसार पालिकेने तत्काळ कारवाई करत दुकानातील सर्व अन्नसाहित्य जप्त केले. मात्र, दुकानदाराने संताप व्यक्त करत तक्रारदाराला थेट ''तुला बघून घेतो'' अशी धमकी दिली. या गंभीर घटनेमुळे प्रथमेश यांनी कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सध्या पोलिसांनी लिंगराज लिगे गौडा यांच्याविरोधात NCR क्रमांक 1356/25 अंतर्गत, कलम BNS 351(2) आणि 174 B.N.S.S. अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनेच्या गंभीरतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांचे मत आहे की अशा प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता विभागाने अधिक कडक आणि नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे.
advertisement
विशेषतहा अशी घटना केवळ एका ग्राहकाच्या अनुभवापुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करते. खाद्यसाहित्य स्वच्छ आणि सुरक्षित असणे हे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करून अशा प्रकारच्या घटनांवर कडक संदेश दिला पाहिजे, जेणेकरून दुकानदारांनी अन्नाच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल.
स्थानिक नागरिकांनी घडलेल्या या प्रकरणावर मोठी चिंता व्यक्त करत दुकानदारांच्या जबाबदारीवर अधिक लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, भविष्यात अशा प्रकरणांना प्रतिबंध घालण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाने नियमित तपासणी, दुकानदारांचे प्रशिक्षण आणि जागरूकता मोहिमांचे आयोजन करावे. यामुळे केवळ एका घटनेतून शिकणे न करता संपूर्ण परिसरातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षेला बळकटी मिळेल.
advertisement
कल्याण परिसरातील ही घटना एक जागरूकतेचा धक्का आहे, ज्यातून स्पष्ट होते की ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा ही कुणालाही दुर्लक्षित करता येणारी बाब नाही. यामुळे अन्न व्यवसायांमध्ये गुणवत्तेची जबाबदारी अधिक काटेकोरपणे पाळली जाणे अत्यावश्यक आहे.
Location :
mumbai
First Published :
August 13, 2025 1:23 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Kalyan News : धक्कादायक!इडली सांबारमध्ये निघाली अळी, ग्राहकाने तक्रार करताच दुकानदारानेच उचललं टोकाचं पाऊल